Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तमाशा LIVE’मध्ये रंगलाय बातम्यांचा फड; सिद्धार्थ- हेमांगीच्या गाण्याने वाढवली धडधड 

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 10, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Tamasha Live
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या आगामी मराठी चित्रपट ‘तमाशा लाईव्ह’ हा चांगलाच चर्चेत आहे. बहारदार गाण्यांची लज्जतदार मेजवानी घेऊन हा चित्रपट येत्या १५ जुलै २०२२ रोजी प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटात एकापेक्षा एक अवली आणि हरहुन्नरी कलाकार आहेत. जसे कि, सचित पाटील, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी आणि अजून असे बरेच. पहिली सुरेल नांदी आणि नंतर रोमँटिक गाण्याची भुरळ घातल्यानंतर विविध रॅप सॉंग्सच्या माध्यमातून या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली. यानंतर आता सिद्धार्थ आणि हेमांगीच बहारदार गाणं रिलीज झालाय जे सोशल मीडियावर गाजतंय.

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

‘तमाशा लाईव्ह’च्या सांगितिक मैफलीतील ‘फड लागलाय’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले असून सोशल मीडियावर राज्य करताना दिसत आहे. या गाण्यात अभिनेत्री हेमांगी कवी आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव एकत्र दिसत आहेत. या गाण्याचे बोल असून ‘ब्रेकिंग न्यूज’ मिळवण्यासाठीची चाललेली शर्यत काय आहे आणि कशी आहे हे सांगतात. हे बहारदार गाणे अमितराज, साजन बेंद्रे आणि वैशाली सामंत या दिग्गज गायकांनी गेले आहे. शिवाय या गाण्याचे संगीत अमितराज यांनी दिले आहे आणि क्षितीज पटवर्धन यांनी या गाण्याची शब्दरचना केली आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात अनेक गाणी आहेत हि प्रत्येक गाणी विविध धाटणीची आहेत. यातील प्रत्येक गाण्यात एक घटना आणि पुढील घटनेचा क्रम आहे. त्यामुळे हि गाणीच कथानकाचा गाभा आहेत म्हणायला हरकत नाही. या गाण्याविषयी बोलताना गीतकार क्षितीज पटवर्धन म्हणाले कि, ‘तमाशा लाईव्ह’ची सर्व गाणी उत्तम आहेत. याचा मला फार आनंद आहे. एक गीतकार म्हणून पहिल्यांदाच मला अशी संधी मिळाली आहे की, एकाच चित्रपटामध्ये शास्त्रीय संगीतापासून रॅपपर्यंत आणि गरब्यापासून पंजाबी गाण्यापर्यंत सर्व प्रकारची गाणी मी लिहीली. चार, पाच चित्रपटातील गाण्यांचा भाव एकाच चित्रपटात आहे. हा एक वेगळाच अनुभव होता.’

Tags: Instagram PostNew Song ReleaseTamasha LiveUpcoming Marathi MovieViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group