Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘दगडी चाळ 2’च्या टीमकडून डॅडींच्या 70’व्या वाढदिवसानिमित्त नवा टिझर रिलीज; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 18, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Dagdi Chawl 2
0
SHARES
6
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गुन्हेगारी विश्वातील ओळखीचे आणि थरार निर्माण करणारे नाव…. डॅडी.. अरुण गुलाब गवळी.. बस नाम हि काफी है! मुंबईत एकेकाळी गॅंगवॉरसाठी अख्खी डॅडींची गॅंग प्रसिद्ध होती. गुन्हेगारी विश्वात त्यांचं नाव म्हणजे एक वेगळाच दरारा. हि व्यक्ती कुख्यात डॉन असली तरीही भायखळा, सातरस्ता अशा भागांमधील लोकांसाठी आजही देव आहे. म्हणूनच त्यांच्या जीवनपटावर आधारित हिंदी आणि मराठी चित्रपट आले. त्यापैकी एक म्हणजे मराठी चित्रपट दगडी चाळ. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. रविवारी १७ जुलै रोजी डॅडींचा ७० वा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त या टीमने सोशल मीडिया नुसता दणाणून टाकल्याचे पहायला मिळाले. या टीमने एक नवा टिझर रिलीज करत हॅपी बर्थडे डॅडी असे म्हटले आहे.

‘दगडी चाळ २’ हा चित्रपट येत्या १८ ऑगस्ट २०२२ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कुख्यात डाॅन अरुण गवळी यांच्या जीवनावर आधारित असून यामध्ये विविध ट्विस्ट पहायला मिळतील. १७ जुलै रोजी या चित्रपटाचा मूळ विषय असलेल्या अरुण गवळी यांचा ७० वा वाढदिवस होता. यानिमित्त ‘दगडी चाळ २’च्या अधिकृत पेजवरुन एक नवा टिझर व्हिडिओ रिलीज केला गेला. या व्हिडिओत ब्लॅक अँड व्हाईट फ्रेममध्ये डॅडी चालत जाताना दिसतात आणि त्यांना भेटायला आलेल्या गर्दीला हात दाखवतात असे दृश्य दिसत आहे. अशा पद्धतीने ‘दगडी चाळ २’च्या टीमने अरुण गवळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संगीता अहिर यांनी ‘दगडी चाळ’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. यानंतर आता ‘दगडी चाळ २’ या चित्रपटाची निर्मिती देखील त्यांनीच केली आहे. तर दिग्दर्शनाची सूत्र चंद्रकांत कणसे यांनी संभाळली आहेत. याशिवाय चित्रपटाची पटकथा मच्छिंद्र बुगडे आणि चंद्रकांत कणसे यांनी लिहिली आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे चित्रपटातील डॅडींच्या मुख्य भूमिकेत अभिनेता मकरंद देशपांडेच दिसणार आहेत.

दगडी चाळ’ चित्रपटामध्ये मकरंद देशपांडे यांनी साकारलेली गवळींची भूमिका प्रेक्षकांना अत्यंत भावली होती. यानंतर दगडी चाळ २ चा टिझर पाहिल्यानंतर पुन्हा एकदा मकरंद देशपांडे यांनी भूमिकेची पकड कायम ठेवल्याचे दिसून आले.

Tags: Arun Gulab GawliDagdi Chawl 2mumbaiOfficial TeaserUpcoming Marathi MovieViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group