Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘Y’ चित्रपटातील वास्तवाचा हायपरलिंक थरार प्रेक्षक अनुभवणार; टीझरमध्ये दिसले ‘हे’ कलाकार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 11, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Y
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून मुक्ता बर्वे अभिनित ‘Y’ या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे. अगदी पहिल्या पोस्टरपासून या चित्रपटाने एक वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींनी Y लिहिलेल्या पोस्टरसह आपापल्या सोशल मीडिया हँडलवर फोटो शेअर केले होते. पुढे हा ‘Y’ चित्रपट असून याच कथानक हटके आणि इतरांपेक्षा वेगळं असल्याची माहिती मिळाली. यातील थरारक वास्तव अनुभवण्यासाठी तुम्ही सज्ज झालेच असाल. अलीकडे एका टीझरमध्ये स्त्री भूमिकांची ओळख करून देण्यात आल्यानंतर आता पुरुष व्यक्तिरेखांची ओळख करून देणारा टिझर रिलीज झालाय.

View this post on Instagram

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

सामान्यांच्या कल्पनेपलीकडील ‘ती’च्या लढ्याची गोष्ट घेऊन हा चित्रपट २४ जून २०२२ रोजी प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन अशा दोन्हीही प्रमुख जबाबदाऱ्या अजित सूर्यकांत वाडीकर यांनी पार पाडल्या आहेत. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मराठीत पहिल्यांदाच असा हायपरलिंक थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे त्यामुळे हा चित्रपट खास आहे. अनेक चित्रपटगृहांमध्ये दिसणाऱ्या स्टँडीज मुळेही ‘Y’ चर्चेत आहे. सुरुवातीला फक्त मुक्ता बर्वेचाच चेहरा समोर आला होता मात्र त्यानंतर आता एकेक करत अन्य कलाकारांचे चेहरे समोर येत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

 

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा एक टिझर रिलीज झाला होता. ज्यामध्ये चित्रपटातील सर्व अभिनेत्रींचे चेहरे समोर आले होते. एकाच वेळी वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडमोडींची एक धावती झलक यामध्ये दाखवली होती. यामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वेशिवाय प्राजक्ता माळी, रसिका चव्हाण अशा अभिनेत्री अन्य प्रमुख भूमिकेत असल्याचे दिसून आले. या टिझरला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता याच चित्रपटाचा दुसरा टिझर प्रदर्शित झालाय. या दुसऱ्या टिझरमध्ये चित्रपटातील अभिनेत्यांचे चेहरे समोर आले आहेत. याची एक मोठी लिस्ट आहे. यात नंदू माधव, संदीप पाठक, ओमकार गोवर्धन, सुहास शिरसाट, प्रदीप भोसले, रोहित कोकाटे, संदीप दंडवते हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत असे दिसून आले. आता प्रतीक्षा आहे ती १३ जून २०२२ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ट्रेलरची..

Tags: Instagram Postmukta barvePrajakkta MaliTeaser OutViral VideoY Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group