हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी वाहिनी स्टार प्रवाहवरील अत्यंत प्रसिद्ध आणि टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असणारी मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेत गेल्या काही भागांमध्ये अत्यंत भावनिक असा ट्विस्ट आल्याचे पहायला मिळाले. गौरी आणि जयदीप यांच्या आई बाबा होण्याचे स्वप्न फुलणार का भंगणार..? असा एक सवाल प्रेक्षकांसमोर उभा राहिला होता. या जीवघेण्या अपघातातून आपली पत्नी आणि बाळ वाचविण्यासाठी जयदीपने कोल्हापूरच्या अंबाबाईकडे साकडे घातल्याचे यात आपण पाहिले. त्यानंतर आता दसरा विशेष भागात आपण शिर्केंच्या कुटुंबात लक्ष्मीचे आगमन होणार असल्याचे चित्र पाहू शकणार आहात.
हे वळण अतिशय रोमांचक असून प्रेक्षक या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. एका भयंकर अशा जीवघेण्या अपघातातून गौरी आणि बाळ वाचावं म्हणून जयदीपने करवीर निवासिनी अंबाबाईला साकडं घातलं. शिवाय मोठ्या श्रद्धेने कडक व्रतदेखील त्याने पूर्ण केलं. याच व्रताचं आता जयदीपला गोड फळ मिळणार आहे. कारण दसऱ्याच्या दिवशी शिर्के पाटील यांच्या कुटुंबात लक्ष्मीचे आगमन होणार आहे. म्हणजेच जयदीप आणि गौरी याना कन्यारत्न प्राप्ती होणार असून गौरीसह तिचे बाळ दोघेही सुखरूप असणार आहेत. त्यामुळे या खास भागाची आतुरता सगळ्यांना लागली आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत गर्भवती असणाऱ्या गौरीचा अपघात झाल्यानंतर तिच्या प्रकृतीविषयी प्रेक्षकही चिंता व्यक्त करत होते. कारण डॉक्टरांनी गौरी आणि बाळ दोघांचेही आयुष्य धोक्यात आहे असे सांगितले होते. ज्यामुळे जयदीपने देवीचे कठोर व्रत केले, सेवा केली.
दरम्यान साक्षात देवी त्याला विविध अवतार घेऊन मदतसुद्धा करायला आली. अखेर त्याच तप त्याची सेवा पूर्ण झाली आणि गौरीसह तिचे बाळ सुखरूप वाचले. येत्या दसरा विशेष भागात जयदीप आणि गौरीला कन्यारत्न प्राप्त झाल्याचे दाखविले जाईल.
Discussion about this post