‘सेक्ससाठी नकार दिला म्हणून मला चित्रपटातून बाहेर काढले – मल्लिका शेरावत

Sharing is caring!

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने एक धक्कादायक खुलासा केला आहे. मल्लिकाने म्हटले आहे की, सेक्ससाठी नकार दिल्यामुळे अनेक चित्रपटातून तिला बाहेर काढण्यात आले आहे. मल्लिकाने #METOO संदर्भात पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे.

मल्लिकाने म्हटले आहे की, सह कलाकारासोबत सेक्स करण्यास नकार दिला म्हणून अनेक चित्रपटातून बाहेर काढण्यात आले आहे. चित्रपटसृष्टीत होणाऱ्या अशा घटनांना रोखण्यासाठी #METOO सारख्या मोहिमेचा फायदा होईल असेही मल्लिकाने म्हटले आहे. याआधी कपिल शर्मा शोमध्ये मल्लिकाने एक अजब किस्सा सांगितला होता. एका चित्रपट निर्मात्याला हॉटनेस चेक करायचा होता आणि त्यासाठी तिच्या पोटावर अंडा फ्राय करायची ईच्छा असे मल्लिकाने सांगितले होते.

#METOOमुळे महिला सशक्त झाल्या असून पुरुष सध्या घाबरले आहेत. ही मोहिम एक सकारात्मक पाऊल असल्याचे तिने सांगितले. चित्रपटात काम करताना सुरक्षित वातावरण असने ही महिला आणि पुरुष हा दोघांचा अधिकार आहे. दरम्यान, मल्लिका सध्या तिच्या आगामी ‘बू सबकी फटेकी’ या वेब सीरीज प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच प्रमोशन दरम्यान तिने #METOO संदर्भात एक मोठ वक्तव्य केले आहे.

Leave a Reply