कधी येणार सेक्रेड गेम २?

Sharing is caring!

मुंबई | बहुचर्चित व प्रतीक्षित सेक्रेड गेम वेब सिरीज होणार तर कधी रिलीज हा चाहत्यांना पडलेला प्रश्न आहे. कमी कालावधी सगळ्यांना आवडलेली ह्या सिरीज चा दुसरा सीजन अजून प्रदर्शित होणार आहे, त्याआधी सिरीज ते पोस्टर आणि टीजर प्रकाशित करून अजून उत्सुकता वाढवली आहे.सुत्रांच्या माहितीनुसार सीरिजचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे. पण ही बहुप्रतिक्षित वेबसीरिज कधी रिलीज होईल यावरून अद्यापही पडदा उचलण्यात आलेला नाही. तर हि वेब सीरिज रिलीज होण्यात विलंब होणार असल्याचे समोर येत आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, ‘सेक्रेड गेम्स २’ ऑक्टोबर महिन्यात रिलीज करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दकी यांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे सीरिजची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

दोन्ही अभिनेत्यांचे व्यस्त वेळापत्रक पाहता ‘सेक्रेड गेम्स २’ च्या रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ‘सेक्रेड गेम्स २’ मध्ये सैफ आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या शिवाय अभिनेता पंकज त्रिपाठीसुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तर ‘सेक्रेड गेम्स २’मध्ये कोण-कोणत्या रहस्यांचा उलगडा होणार, हे पाहाणे औचुक्याचे ठरणार आहे. २००६ साली लेखक विक्रम चंद्रा लिखीत एका कादंबरीवर वेब सीरिजची कथा आधारलेली आहे.

Leave a Reply