हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या कलर्स टीव्हीवर कमालीचे मनोरंजक शो सुरु आहेत. ज्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येत ते रिऍलिटी शो ‘बिग बॉस १६’. यापुढे बोलायचं झालं तर डान्सिंग रिऍलिटी शो ‘झलक दिखला जा’. यावेळीही झलक दिखला जा’च्या दहाव्या पर्वाची जोरदार चर्चा आहे. सध्या या शोमध्ये एकामागे एक वाईल्ड कार्ड एंट्री होत आहेत. अलीकडेच अभिनेत्री स्रिती झा या कार्यक्रमात वाईल्ड कार्ड म्हणून येत असल्याचा प्रोमो रिलीज झाला आहे. यानंतर आता कोरिओग्राफर आणि खतरों के खिलाडी फेम निशांत भट्ट या शोमध्ये एंट्री करतो आहे. तसा प्रोमोदेखील रिलीज झाला आहे.
या प्रोमोमध्ये कोरिओग्राफर निशांत भट्ट भुलभुलैय्या २ चित्रपटातील ‘आमी जे तोमार’ या गाण्यावर थिरकताना दिसतोय. यानंतर स्पर्धक म्हणून सहभागी झालेली अभिनेत्री अमृता खानविलकर निशांतला कार्यक्रात सहभागी झाल्याबद्दल वेलकम म्हणते. यावर निशांत मजेशीर अंदाजात तिला म्हणतो की, अम्मू मी तुला किती डान्स शिकवला आहे. यावर अमृता म्हणते, हो शिकवलाय. यावर पुन्हा निशांत म्हणतो कि, मग इथे येऊन तुला काय झालंय..? यानंतर निशांत आणि निया शर्मामध्ये देखील हेल्दी संभाषण होताना दाखवले आहे.
जसे कि निया निशांतच्या येण्याने शोची लेव्हल वाढली आहे म्हणते आणि त्यावर असंही म्हणते कि, पण मीसुद्धा इथे शेंगदाणे खायला नाही आली ब्रो… त्यामुळे आता झलक दिखलाच्या मंचावर या कलाकारांना कांटे कि टक्कर देताना पहायला आणखीच मजा येणार आहे. निशांत भट्ट बद्दल सांगायचं झालं तर, तो स्वतः एक उत्तम डान्सर आहे. शिवाय त्याने विविध चित्रपटांसाठी आईंक कलाकारांच्या आपल्या तालावर नाचवले आहे. याशिवाय त्याच सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे. अलीकडेच तो खतरों के खिलाडीच्या १२ व्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. मात्र अंतिम टप्प्यावर पोहोचल्यानंतर प्रकृतीच्या कारणामुळे त्याला खेळातून बाहेर व्हावे लागले होते.
Discussion about this post