हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन सृष्टी ज्यांच्या नावाने ओळखली जाते त्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा काल ७६ वा वाढदिवस झाला. आयुष्यातील अनेक वर्ष त्यांनी मनोरंजन विश्वाला दिली आहेत आणि आपल्या अव्वल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ते नेहमीच अधिराज्य गाजवत आले आहेत. प्रत्येक कलाकारासोबत त्यांनी काम केले असेल वा नसेल तरीही प्रत्येकासोबत त्यांचं एक वेगळं आणि खास नातं आहे. अशोक मामा आहेतच वेगळं आणि त्यामुळे त्यांचं वेगळेपण अगदी स्पष्ट दिसून येत. त्यांचं वेगळेपण जपण्यामध्ये त्यांची पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांची त्यांना मोठी साथ लाभली. वाढदिवसानिमित्त निवेदिता यांनी अशोक सराफ यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. जी तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर अशोक मामांच्या अनेक चाहत्यांनी विविध पोस्ट, कमेंट, स्टोरी शेअर करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांनी त्यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. त्यांनी अशोक सराफ यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे कि, ‘हॅपी बर्थडे माय डार्लिंग… मी खूप भाग्यवान आहे की तू माझा जोडीदार आहेस. तू माझा मित्र आहेस, माझा मार्गदर्शक आहेस, तू सगळं काही आहेस. लव्ह यू’.
निवेदिता यांची हि पोस्ट कालपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसं तर नेहमीच निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांची लव्हस्टोरी चर्चेचा विषय ठरताना दिसते. त्यांनी आणि अशोक सराफ यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. नुसते काम केले नाही तर त्या त्या भूमिका गाजवल्या आहेत. शिवाय त्यांची जोडी एव्हरग्रीन जोड्यांपैकी एक आहे आणि त्यांच्या वैयक्तिक चाहत्यांइतकेच त्यांच्या जोडीचाही जबरदस्त चाहता वर्ग आहे. निवेदिता यांच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत मामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Discussion about this post