हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या माणसांच्या आयुष्यात नियम आणि अटींचं महत्व फार असत. शाळेत असताना शाळेचे नियम, पालकांचे नियम, मित्रांमध्ये असताना मैत्रीचे नियम आणि लग्न झाल्यावर.. ते काही वेगळं सांगायला नको. आपण नेहमीच एकमेकांवर नियमांचं आणि अटींचं ओझं लादत असतो.पण नियम सांगणारे आपण स्वतः नियम पाळतो का..? आज एक तर उद्या दुसरं अशी मानवी प्रवृत्ती. थोडक्यात काय तर आपण पळवाट शोधतो. पण हि पळवाट नवरा बायकोच्या नात्यात शोधताना जी गोची होते ती आता रंगभूमीवर पहायला मिळणार आहे. होय. प्रशांत दामले आपल्या भन्नाट शैलीसह एक खुसखुशीत नाटक घेऊन नाव आहे ‘नियम व अटी लागू’
अनेकदा आयुष्यात एखादी गोष्ट मार्गी लावायची असली कि नवरा- बायको एखादा कडक नियम लागू करतात. ज्याच्या अटींची पूर्तता करताना दोघांनाही सळो कि पळो होत. पण तरीही करायला हवं म्हणून संसाराचा गाडा रेटत बसतात. आता या नियम अटींची ही कसरत पार पाडताना एखाद्या जोडप्याची काय अवस्था होत असेल हे पहायचे असेल तर ‘नियम व अटी लागू’ हे नाटक जरूर पहा.
निर्माते प्रशांत दामले यांनी रसिक प्रेक्षकांसाठी भन्नाट नियम आणि मजेशीर अटी असलेलं हे नाटक रंगभूमीवर आणलं आहे. गौरी थिएटर निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘नियम व अटी लागू’ या नव्या नाटकाचा शुभारंभ येत्या शनिवारी, १८ मार्च २०२३ रोजी, सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली येथे रात्री ८.३० वाजता होणार आहे.
प्रशांत दामले यांचं नाटक म्हणजे धम्माल आणि विनोदाचे फंवारे उडणार यात काही शंकाच नाही. मात्र हे नाटक जितकी हलकी फुलकी मजा आणेल तितकाच एक महत्वाचा संदेश घेऊन येत आहे. या नाटकातील नियम आणि अटी नीट पहिल्या तर कळेल कि आयुष्यात जागरूकता किती महत्वाची असते.
निर्माते प्रशांत दामले, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि आपल्या खुमासदार लेखणीने ‘नियम व अटी लागू’ करणारा युवा लेखक संकर्षण कऱ्हाडे या त्रिकुटाचं हे नाटक भन्नाट मजा आणणारं आहे. मुख्य म्हणजे या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Discussion about this post