हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच ११ मार्च २०२२ रोजी सर्वत्र राज्यात ‘द काश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित झाला. याच चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केले आहे. तर गेल्या ४ मार्च २०२२ रोजी सर्वत्र राज्यात झुंड हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला आहे. यता दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनानंतर संपूर्ण राज्यात दोन वेगवेगळे गट पडले आहेत. यातील एक गट या चित्रपटाचे समर्थन करतोय तर दुसरा गट विरोध. यामुळे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे. यावर आता नागराज मंजुळे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
चित्रपटांवर सुरु असलेल्या वादावर मंजुळे म्हणतात कि, ‘प्रत्येकजण मतं मांडू शकतो. पण फिल्म बघून तुम्ही मतं मांडली आणि त्यात तथ्य असेल तर विचार करता येईल. चित्रपट करताना काही ठरवून करता येत नाही. कला ही एक अशी गोष्ट आहे, ज्याचा काही अंदाज आपण बांधू शकतो. पण अगदी तसंच होईल किंवा व्हायला पाहिजे, याचा हट्ट करू शकत नाही. कोण काय बोलतंय, त्याला तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. असे दोन गट पडायची गरज नाही. चित्रपटाची अशी काही गटबाजी नसते. फिल्म येतात आणि आपणच दोन फिल्म्समध्ये भांडण लावतो, याला काही अर्थ नाही. फिल्मला फिल्मसारखं ट्रिट केलं पाहिजे. त्यात वादाचा मुद्दाच नाही.”
या दरम्यान मंजुळे यांची आपल्या सर्वात पहिल्या शॉर्टफिल्मचादेखील किस्सा सांगितला. पहिली शॉर्ट फिल्म ‘पिस्तुल्या’ची शूटिंग अहदमनगरमध्ये झाली होती. त्याच्या आठवणी काही वेगळ्या आहेत. “खूप दिवसांपासून झुंड हा चित्रपट रखडला होता. तो अखेर रिलीज झालाय याचा आनंद आहे. कोविड आणि सुरुवातीला निर्मिती प्रक्रियेत अडथळा आला होता. पिस्तुल्याची शूटिंग अहमदनगरमध्ये केली होती. माझी पहिली शॉर्ट फिल्म मी इथे चित्रीत केली होती आणि आता झुंडच्या निमित्ताने इथे पुन्हा आलो आहे”, हे फिलिंग काही वेगळं होत. पण आता चालू वाद पाहून मी माझ्या भावना दाबणार नाही. उलट आणखी व्यक्त होईन असं वाटतंय.
Discussion about this post