हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या डान्स मूव्ह्समूळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. नुकतेच तिला कतारमध्ये फीफा वर्ल्ड कपमध्ये परफॉर्म करण्याची संधीदेखील मिळाली होती आणि फिफा वर्ल्ड कप २०२२च्या फॅन फेस्टिव्हलमध्ये तिने जबरदस्त परफॉर्मन्स दिला. पण यावेळी तिच्याकडून भारतीय ध्वजाचा अपमान झाला. व्हायरल व्हिडिओत दिसतंय कि, नोराला स्टेजवर तिरंगा देताना तो तिच्या दिशेने फेकण्यात आला. ज्यामुळे तो स्टेजवर खाली पडला. तो तसाच उचलत नोरा तो फडकवताना दिसली. जणू ती काही ओढणी फिरकवतेय. यात मोठा अपमान तेव्हा झाला जेव्हा नोरानं तिरंगा उल्टा पकडला आणि तसाच फडकवला.
या व्हायरल व्हिडीओमध्ये नोरा फतेही देशाबद्दल बोलतानादेखील दिसतेय. ती बोलतेय की, ‘भारत भले फिफा वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाला नसेल पण मी एक भारतीय म्हणूनच या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे. आपल्या भारतीय संगीताच्या आणि नृत्याच्या माध्यमातून.’ नोराचं हे बोलणं ऐकून उपस्थितांमध्ये उत्साह आणि जोश आला. याशिवाय नोराने सर्वांना तिच्यासोबत ‘जय हिंद’च्या घोषणा देण्यासही सांगितले आणि बघता बघता सगळ्यांनी तिच्यासह ‘जय हिंद’च्या घोषणाही लगावला. भारत आणि भारताविषयीच्या सुरु असलेल्या जय हिंदच्या घोषणांनी संपूर्ण स्टेडियम दणाणून गेला. पण या सगळ्यात नोरा फतेहीने हातात धरलेला भारताचा झेंडा उलटा फडकावला आणि चूक दुर्लक्ष करण्यासारखी नाही. यामुळे हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि नोरा ट्रोल झाली.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत अनेक नेटकरी नोराच्या चुकीला गुन्हा म्हणताना दिसत आहेत. तर काही तिच्याकडून झालेली चूक नकळत झाल्याचे म्हणताना दिसत आहेत. मात्र प्रचंड संख्येतील लोक नोराने तिरंग्याचा अपमान केल्याबद्दल तिच्यावर टीका करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर एकाने लिहिले आहे कि, ‘उलटा तिरंगा पकडलास, डोक्याने कमी आहेस का ग तू नोरा.’. तर दुसऱ्यानं लिहिलंय, ‘तिरंग्याला ज्या पद्धतीनं तिला दिलं ते खूपच अपमानास्पद आहे.. हे योग्य नाही’. अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘नोराला तिरंग्याचा मान राखता आला नाही. ‘जय हिंद’ घोषणा देऊन स्वतःच राष्ट्रीय ध्वजाचा अपमान करतेय हि’. तर अन्य काहींनी म्हटले आहे कि, ”नोराला तिरंगा पकडायचा कसा..? फडकवायचा कसा..? हे देखील माहित नाही. हे खूपच अपमानास्पद आहे.’ या सर्व प्रकारामुळे जगभरातील भारतीय आणि नोराचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत.
Discussion about this post