हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि नोरा फतेही या दोघीही सोशल मीडियावर अनेकदा ट्रेंडिंगचा विषय असतात. या दोघींच्या डान्स मूव्ह्स इतक्या कातिल आहेत कि कुणीही आपलं हृदय हातावर घेईल. मलायका अरोराने १९९८ साली शाहरुख- प्रीती आणि मनिषा कोईरालाच्या ‘दिल से..’ या चित्रपटात ”छैय्या छैय्या’ म्हणत ट्रेनच्या छतावर डान्स केला होता. तुम्हाला आठवत असेलंच ना! कारण अनेकदा आजही मलायका याच गाण्यावर थिरकताना दिसते आणि मग ट्रोलही होते. पण सध्या या गाण्यावर मलायका आणि नोराचा फेस ऑफ व्हायरल होतोय आणि सोबतच ट्रोलसुद्धा.
मलायका आणि नोरा एकमेकींना आव्हान देत ‘छैय्या छैय्या’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. पण त्यांचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज सगळ्यांनाच सोसणारा नाहीये. काळ्या रंगाच्या हॉट शॉर्ट ड्रेसमध्ये मलायका आणि नोराच्या मूव्ह्स पाहून सोशल मीडियावरील तापमान आपोआपच वाढलं आहे. त्या डान्स छान करतात असे सगळेच म्हणत आहेत पण मुळात हा फेस ऑफ डान्स नाहीच असे अनेकांचे म्हणणे आहे. नोरानं इंस्टाग्रामवर या डान्स फेस ऑफची एक झलक शेअर केली आहे आणि सोबत ‘जर मी हा डान्स तेव्हा केला असता तर ट्रेनच्या छतावर चढून जोरजोरात ओरडली असती. मलायकासोबत डान्स करण्याचं माझं स्वप्न पू्र्ण झालं..नक्की बघा हा डान्स’ असं कॅप्शन दिलंय.
या व्हिडिओवर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया देताना दोघींनाही ट्रोल केले आहे. एकाने म्हटले आहे कि, ‘हा जर डान्स असेल तर मी गोविंदा आहे’. अन्य एकाने म्हटले आहे कि, ‘या दोघी म्हणजे शकीरा आणि बिंयोंसेची ‘स्वस्तातली कॉपी”. आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘बॉलिवूडकडे न्यूडिटी शिवाय उरलंच काय आहे’. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं आहे कि, ‘मला कुणीतरी दिसलाईकचं बटण कुठे आहे प्लिज दाखवा’. अन्य एका युजरने लिहिले आहे कि, ‘बाकीचे कपडे पण काढून टाका.. काय फायदा एव्हढी तरी इज्जत झाकायचा’.
Discussion about this post