हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातून अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित झालेल्या ‘नुक्कड’ या लोकप्रिय मालिकेतील ‘खोपडी’ ही व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचे आज निधन झाले आहे. खोपडी हि भूमिका अव्वलरित्या साकारून ते घराघरांत पोहोचले. आज १५ मार्च २०२३ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेते समीर खक्कर यांनी विविध मालिका तसेच अनेक चित्रपटांमध्ये विशेष भूमिका साकारल्या आणि गाजवल्या होत्या. त्यामुळे मनोरंजन विश्वात त्यांच्या निधनाची बातमी पसरताच शोक व्यक्त केला जात आहे.
Veteran actor Sameer Khakhar passes away, confirms his brother Ganesh Khakhar.
"He experienced some respiratory issues yesterday morning, we called the doctor & he told us to get him admitted. We took him to hospital & he was admitted to ICU. He then had multiple organ failures… https://t.co/xfZpMdwZiw pic.twitter.com/l41ZiDaxzv
— ANI (@ANI) March 15, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेते समीर खक्कर हे श्वासोच्छवासाचा त्रास आणि इतर काही वैद्यकीय समस्यांनी त्रासलेले होते. काल दुपारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याचे समजताच त्यांना तातडीने बोरिवलीच्या एमएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान समीर यांचे वय ७१ होते. ‘नुक्कड’ मालिकेतील त्यांनी साकारलेले ‘खोपडी’ हे पात्र एका मद्यवेड्या व्यक्तीचे होते. मात्र तरीही या पात्राची प्रेमळ आणि मायाळू बाजू समीर यांनी वठवली आणि प्रेक्षकांना ती बाजू प्रचंड भावली.
समीर खक्कर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. गेली ३८ वर्ष त्यांनी अभिनय कलाक्षेत्राला वाहिली आहेत. ‘नुक्कड’ या टीव्ही मालिकेशिवाय ‘पुष्पक’, ‘शहेनशाह’, ‘रखवाला’, ‘दिलवाले’, ‘राजा बाबू’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. परंतु, १९९६ साली त्यांनी अभिनय कारकिर्दीला निरोप देत अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत ते जावा कोडर म्हणून नोकरी करत होते. मात्र जेव्हा ते परत आले, तेव्हा त्यांनी पुन्हा सिनेविश्वात काम सुरू केलं. समीर यांनी सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपटात झळकले होते.
Discussion about this post