Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘वाळवी’ घेऊन आलाय ‘एकावर एक तिकीट FREE’ची ऑफर; मग करा आजचा प्लॅन मित्रासोबत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 13, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Vaalvi
0
SHARES
378
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वाळवी… लाकूड पोखरणारी ही किड जर एखाद्या नात्याला लागली तर..? ऐकून थोडं आश्चर्य वाटलं ना..? अशीच नात्याला लागलेली ‘वाळवी’ आजपासून चित्रपटगृहात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर आल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. पण चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काहींच्या डोक्याला मुंग्या आल्या असतील. हि नक्की काय भानगड आहे..? हा काय प्रकार आहे असा सगळ्यांना प्रश्न पडला. तर या प्रश्नाचे उत्तर आजपासून चित्रपट गृहात मिळणार आहे. शिवाय हा चित्रपट एका तिकिटावर एक तिकीट फ्री ची दमदार ऑफरसुद्धा घेऊन आला आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeStudios (@zeestudiosmarathi)

झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी निर्मित तसेच परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ हा चित्रपट आजपासून अर्थात दिनांक १३ जानेवारी २०२३ पासून सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात नक्की काय आहे..? हे जाणून घेण्याची प्रतीक्षा अखेर आज संपली आहे. आनंदाची बाब म्हणजे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी म्हणजेच १३ जानेवारीला जो प्रेक्षक संध्याकाळी सहा ते दहा वाजताच्या शोचे तिकीट काढेल, त्याला एका तिकीटावर एक तिकीट मोफत देण्याची घोषणा झी स्टुडिओज टीमतर्फे करण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeStudios (@zeestudiosmarathi)

या घोषणेनंतर अनेक प्रेक्षकांनी या संधीचा लाभ घेतला आहे. तुम्ही घेतला नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाहीये. यंदाची संक्रांत प्रेक्षक ‘वाळवी’ पाहून साजरी करतील, इतकं नक्की. चित्रपटाचे शीर्षक जितके हटके कथानकदेखील तितकेच वेगळे आहे. ‘वाळवी’ची कथा, पटकथा आणि संवाद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. तर चित्रपटात सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता हि वाळवी नक्की कुणाला आणि कशी लागली हे जाणून घ्यायची तुम्हालाही उत्सुकता असेल तर चित्रपट जरूर पहा.

Tags: Anita DateMarathi MovieShivani Survesubodh bhaveswapnil joshiVaalvi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group