हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ठाण्याचा ढाण्या वाघ… धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाने नुकतेच यशस्वी वर्ष पूर्ण केले आहे. या वर्षपूर्तीनिमित्त एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेल्यावर्षी दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी कोलशेत येथे धर्मवीर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. या दरम्यान उभारण्यात आलेल्या जुन्या आनंद आश्रम प्रतिकृतीच्या सेटवर हा वर्षपूर्तीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी धर्मवीरांच्या गोष्टी खूप बाकी आहेत.. असे म्हणत ‘धर्मवीर २’ ची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे पहिल्या भागात धर्मवीर यांचा अपघाती मृत्यू नेमका कसा झाला..? हा अपघात होता कि कट..? यामागील रहस्य दुसऱ्या भागात उलघडण्याची शक्यता आहे.
‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त चित्रपटातील सर्व कलाकार आणि दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. दरम्यान ‘धर्मवीर एका भागात संपणारा विषय नसून तो एक खंड आहे. धर्मवीरांच्या गोष्टी खूप बाकी आहेत. अनेक भाग करून ही त्यांच्या गोष्टी संपणाऱ्या नाहीत. त्यामुळे धर्मवीरचा दुसरा भाग २०२४ रोजी आपल्या भेटीला घेऊन येत आहोत’ अशी अधिकृत घोषणा निर्माते मंगेश देसाई यांनी मुख्य कलाकार अभिनेता प्रसाद ओक यांच्या समवेत केली.
धर्मवीरच्या पहिल्या भागात आनंद दिघे यांची राजकीय कारकीर्द आपण पाहिली. मात्र चित्रपटाच्या शेवटी आनंद दिघे यांचा अपघात झाला आणि रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याचे दाखविले. या प्रसंगी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे दिले पाणावले. पण आता दुसऱ्या भागात धर्मवीर नसतील तर नेमके काय दाखवणार..? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबर बोलताना मंगेश देसाई यांनी सांगितले की, ‘धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे अनेक पैलू अद्याप गुलद्त्यातच आहेत. जे लोकांपर्यत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या भागात त्या गोष्टी आपल्याला पहायला मिळणार आहेत’. या आगामी भागाची कथा, पटकथा, संवाद तसेच दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे असून पहिल्या भागातील कलाकारचं आपापल्या व्यक्तिरेखेला न्याय देताना दिसणार आहेत.
Discussion about this post