हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत सुवर्ण इतिहासाची अनेक पाने अलगद उघडली जात आहेत. ऐतिहासिक चित्रपटांची जणू भली मोठी लाटच आली आहे. अलीकडेच ‘शिवप्रताप गरुडझेप’ आणि ‘हर हर महादेव’ या चित्रपटांच्या भव्य यशानंतर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाचीही घोषणा झाली. यातच आता अनुप जगदाळे दिग्दर्शित बहुचर्चित ‘रावरंभा’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. शिवाय या भूमिकेत कोण आहे यावरूनही पडदा उघड झाला आहे.
‘रावरंभा’चे पोस्टर या चित्रपटाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरून शेअर करण्यात आले आहे. पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘निधड्या छातीवरती हे, शिवतेज तळपते! गुजर कुळीचे नाव उजळते तलवारीचे पाते.. सरनोबत प्रतावराव गुजर यांच्या अतुलनीय शौर्याची गाथा.. रावरंभा ७ एप्रिल २०२३ पासून चित्रपटगृहात!’ या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका स्वराज्याचे दुसरे सरसेनापती प्रतावराव गुजर यांच्या भूमिकेचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या भूमिकेत मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अशोक समर्थ दिसणार आहेत. सध्या ते ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत नकारात्मक भूमिकेत आहेत.
‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती शशिकांत पवार प्रोडक्शन यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी केले आहे. पोस्टर रिलीजसोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. येत्या वर्षात ७ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात येणार आहे.
‘रावरंभा’ या चित्रपटाची कथा एक ऐतिहासिक प्रेमकहाणी असणार हे आधीच सांगितले होते. मात्र यात कोणकोणते कलाकार कोणकोणत्या भूमिकेत दिसणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तरी चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अशोक समर्थ यांना पाहून चित्रपटाबाबत एक विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे हे नक्की!
Discussion about this post