Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘एक चट्टान, सौ शैतान…’; अजय देवगणच्या ‘भोला’चे लक्षवेधी मोशन पोस्टर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 20, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Bholaa
0
SHARES
97
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा सिंघम अभिनेता आणि निर्माता अजय देवगण आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अलीकडेच त्याच्या ‘दृश्यम २’ या सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवला. यानंतर आता सर्वत्र त्याच्या आगामी चित्रपट ‘भोला’ची चर्चा आहे. या चित्रपटाचा टिझर आल्यापासून सगळ्यांना अजयच्या लूकबाबत एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच आता या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यामध्ये अजयचा लूक पाहून अंगावर काटा येतो आहे. अतिशय वेगळा आणि लक्षवेधी असा लूक या पोस्टरमध्ये पहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या ‘भोला’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. टीझरनंतर आता या चित्रपटाच्या मोशन पोस्टरने सोशल मीडिया गाजवला आहे. अगदी काही तासांपूर्वीच हे मोशन पोस्टर रिलीज झाले आहेत. ज्यामध्ये अजय देवगणचा कधीही न पाहिलेला असा वेगळाच लूक आपल्या समोर आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

अजयने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर हे मोशन पोस्टर शेअर केले आहेत. सोबतच सिनेमाची रिलीज डेटसुद्धा जाहीर केली आहे. या मोशन पोस्टरमध्ये लिहिले आहे ‘एक चट्टान, सौ शैतान…’. या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बूदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘भोला’ हा चित्रपट येत्या वर्षात ३० मार्च २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

‘भोला’ चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये अजयचा जो लूक दिसतो आहे तो नक्की हिरोचा आहे कि व्हिलनचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सिंघम अजयला या अवतारात पाहणे त्याच्या चाहत्यांसाठी खरंच फार वेगळा अनुभव आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट थ्रीडीमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अजयचा भोला काहीतरी धमाकेदार घेऊन आपल्या भेटीला येतोय हे नक्की. चाहत्यांनी अजयच्या पोस्टरवर शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अजय देवगणनेच केले आहे. त्याने याआधीदेखील ३ चित्रपट दिग्दर्शित केले आहेत आणि हा त्याचा चौथा चित्रपट आहे. माहितीनुसार, ‘भोला’ हा तमिळ चित्रपट ‘कैथी’चा हिंदी रिमेक आहे.

Tags: Ajay DevgnBholaBollywood Upcoming MovieInstagram PostMotion PosterVial Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group