Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मराठ्यांच्या शौर्यगाथेचा साक्षीदार ‘रामशेज’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; पोस्टरने वेधलं लक्ष

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 8, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Ramshej
0
SHARES
515
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०’व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून अनेक ऐतिहासिक चित्रपटांची मोपथ्य दिमाखात घोषणा करण्यात आली. नुसती घोषणा नव्हे तर या चित्रपटांच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण करत प्रेक्षकांची उत्सुकता देखील वाढवण्यात आली. यामध्ये आगामी मराठी ऐतिहासिक चित्रपट ‘रामशेज’चा देखील समावेश आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर तुफान व्हायरल होत आहे. चित्रपटाच्या पोस्टरमधील आकर्षकता हीच प्रेक्षकांच्या उत्सुकतेचे कारण ठरत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ramshej The Film (@ramshejthefilm)

आतापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ज्यामध्ये ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या ‘शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील कलाकृतींना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. यानंतर आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची आणखी एक शौर्यगाथा घेऊन ‘रामशेज’ आपल्या भेटीला येत आहे. ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘मुरारबाजी’ या चित्रपटाचे निर्माते ‘रामशेज’ या आगामी ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करत असून येत्या काही दिवसांत या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankit Mohan (@ankittmohan)

चित्रपटाचे शीर्षक ‘रामशेज’ हा एक किल्ला आहे. जो नाशिकपासून १६ किलोमीटर अंतरावर आहे. मराठ्यांनी तब्बल साडेसहा वर्षं मुघलांविरुद्ध हा किल्ला लढवला होता. याशिवाय प्रभू श्रीराम श्रीलंकेला जात असताना या किल्ल्यावर वास्तव्यास होते आणि म्हणून या किल्ल्याचे नाव ‘रामशेज’ पडले अशी एक आख्यायिका सांगितली जाते, त्यानुसार चित्रपटाच्या पोस्टरमध्ये शिवाजी महाराजांचा मावळा आणि त्यामागे प्रभू श्रीरामांची छाया दर्शवली आहे. या चित्रपटात मराठी अभिनेता अंकित मोहन प्रमुख भूमिकेत तर हरीश दुधाडे, प्राजक्ता गायकवाड हे महत्वपूर्ण भूमिकेत दिनार आहेत.

Tags: Ankit MohanInstagram PostMarathi Historical MoviePoster ReleasedUpcoming Marathi MovieViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group