Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘दामाद है ये पाकिस्तान का..’; सनी देओलच्या ‘गदर 2’चा टिझर सोशल मीडियावर लीक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 10, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Gadar 2
0
SHARES
76
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेलचा यांचा ‘गदर २’ सिनेमा या वर्षी प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचा पहिला भाग ‘गदर- एक प्रेम कथा’ २००१ साली प्रदर्शित झाला होता. यानंतर तब्बल २२ वर्षांनी हा सिनेमा थिएटरमध्ये पुन्हा रिलीज करण्यात आला आहे. शुक्रवारी ९ जून२०२३ रोजी ‘गदर’चा पुन्हा थिएटर रिलीज झाला. दरम्यान ‘गदर’च्या रिलीजसोबत ‘गदर २’चा टिझर रिलीज करण्यात आला आहे. मात्र हा टिझर केवळ ‘गदर’ पहायला जाणाऱ्या प्रेक्षकांनाच पाहता येणार आहे. असे असूनही हा टिझर सोशल मीडियावर लीक झाल्याचे समोर आले आहे.

#Gadar2 teaser out now#GadarEkPremKatha pic.twitter.com/iPfcEv1BQ0

— Abhishek jadam (SavLa) (@Abhishekjadam1) June 9, 2023

‘गदर’ सिनेमा संपल्यानंतर त्याच्या शेवटी ‘गदर २’ची झलक दाखवण्यात आली आहे. त्यामुळे जे ‘गदर’ पहायला थिएटरमध्ये जातील त्यांना ‘गदर २’चा टीझर पाहण्याची संधी मिळणार आहे. असे असताना हा टिझर सोशल मीडियावर लीक झाला आहे आणि त्याचे शॉर्ट व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ट्विटरवर ‘गदर २’च्या टीझरचे व्हिडीओ काही नेटकऱ्यांनी शेअर केले आहेत. ज्यामध्ये सनी देओलचे दमदार डायलॉग ते अॅक्शन सिक्वेन्स पहायला मिळत आहेत. ‘गदर २’ सिनेमाच्या टीझरची सुरुवात एका महिलेच्या आवाजाने होते. ती म्हणतेय कि, ‘दामाद है ये पाकिस्तान का, उसको नारियल दो, टीका लगाओ, वरना लाहौर ले जाएगा’. प्रेक्षकांनी या डायलॉगला डोक्यावर उचलून घेतले आहे.

Gadar 2 Teaser #Gadar2 @Anilsharma_dir #SunnyDeol #GadarEkPremKatha pic.twitter.com/1v4W4PZY40

— Rahul Singh Rajawat (@Rahulsi16973840) June 9, 2023

याशिवाय सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सनी देओल थिएटरमध्ये ‘गदर’ पहायला आलेल्या प्रेक्षकांच्या भेटीला गेला आहे. इथे त्याने ‘गदर’मधील ‘हिंदुस्तान जिंदाबाद है, जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा’ हा डायलॉग म्हटला आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’मध्ये सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा येत्या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्य साधत ११ ऑगस्ट २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Tags: Ameesha PatelGadar 2Official Teasersunny deolTweeter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group