हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध धाटणीचे विविध चित्रपट मनोरंजनात नेहमीच भर घालत असतात. त्यामुळे जितके वेगळे कथानक तितकी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिक पहायला मिळते. सध्या ‘मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’ असे वेगळेच शीर्षक असणारी शॉर्टफिल्म चर्चेत आहे. अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर या शॉर्टफिल्ममध्ये दिसणार आहेत. कॉटनकिंगचे संचालक कौशिक मराठे यांची प्रस्तुती असलेल्या आणि अद्भुत प्रॉडक्शन्सच्या मोनिका धारणकर व वैभव पंडित यांची निर्मिती असलेली ही शॉर्टफिल्म १२ मे रोजी सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित होणार आहे.
नुकतेच ‘मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’ या शॉर्टफिल्मचा जबरदस्त टीझर आणि पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. या शॉर्टफिल्ममध्ये ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका फेम अनिरुद्ध देवधर आणि ‘गंगुबाई’ फेम सलोनी दैनी हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सहज लिखाणासाठी ओळख असलेल्या मोनिका धारणकर यांनी या शॉर्ट फिल्मचे दर्जेदार अन प्रभावी लेखन केले आहे. तर ऍड- फिल्म मेकर वैभव पंडीत यांनी हि शॉर्ट फिल्म दिग्दर्शित केली आहे.
कॉटनकिंग नेहमीच दर्जेदार शॉर्ट फिल्मद्वारे प्रेक्षकांसमोर संवेदनशील विषयांची पद्धतशीर मांडणी करत आला आहे. अत्यंत चमत्कारिक आणि विचारबाह्य असं नाव असलेल्या ‘मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’ या त्यांच्या नव्या शॉर्टफिल्मची कथादेखील यावेळी कुठल्या अनोख्या शैलीत असण्याची शक्यता नाकारताना येत नाही. पण ती शैली नेमकी काय असेल? कशी असेल? हे जाणून घेण्याची उत्सुकता काही औरच आहे. शिवाय सुबोध भावे आणि मधुरा डिजिटल प्लॅटफॉर्मवर झळकणार आहेत त्यामुळे हि शॉर्टफिल्म काहीतरी कमाल घेऊन येत आहे हे नक्की!
Discussion about this post