Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हे सगळं माझ्या राशीला का..?; गोडसेंची भूमिका साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरला पडलाय प्रश्न

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 16, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Chinmay Mandlekar
0
SHARES
66
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता चिन्मय मांडलेकरने अनेक विविध ढंगाच्या आणि धाटणीच्या भूमिका साकारून प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून चिन्मय मांडलेकर साकारत असलेल्या गोडसेंची भूमिका देखील प्रचंड चर्चेत आहे. असे असताना आता चिन्मय म्हणतोय कि, ‘हे सगळं माझ्या राशीला का..?’ असं काय झालंय म्हणून चिन्मयला हा प्रश्न पडला आहे..? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना..? तर मित्रांनो याच उत्तर आहे ‘आलंय माझ्या राशीला’. येत्या १० फेब्रुवारी २०२३ रोजी चिन्मयचा नवा चित्रपट येतोय आणि त्याचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तुम्हाला विविध राशींचे सौंदर्य समजावून देणारा आहे.

View this post on Instagram

A post shared by Chinmay Deepak Mandlekar (@chinmay_d_mandlekar)

आनंदी वास्तू आणि साईकमल प्रोडक्शन निर्मित ‘आलंय माझ्या राशीला’ या मराठी चित्रपटाचा अफलातून टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकरसोबत अनेक तगड्या कलाकारांची फौज आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा धमाकेदार टिझर प्रदर्शित झाल्यापासून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतो आहे. या चित्रपटात चिन्मय मध्यवर्ती भूमिकेतून आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या कथानकातून आपण विविध राशींच्या गमती जमती आणि त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. असं म्हणतात कि, १२ राशींची विविध स्वभाव वैशिष्टय़े असतात. ज्याचा आपल्या मानवी जीवनावर मोठा प्रभाव असतो. याच वैशिष्टयांची ओळख, सौंदर्य आणि मजा आपण या चित्रपटात पाहू शकणार आहोत.

राशींच्या उत्सुकतेला अभ्यासाच्या आणि विज्ञानाच्या आधारे जोडणारा ‘आलंय माझ्या राशीला’ हा चित्रपट अजित शिरोळे यांनी दिग्दर्शित केला आहे. तर सुप्रसिद्ध वास्तु तज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि अश्विनी पिंपळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. यामध्ये चिन्मय मांडलेकरसह अलका कुबल, मोहन जोशी, निर्मिती सावंत, प्रसाद ओक, अतुल परचुरे, मंगेश देसाई, उषा नाईक, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, स्वप्निल राजशेखर‌, पौर्णिमा अहिरे, दिगंबर नाईक, संग्राम चौगुले, सिद्धार्थ खिरीड हे कलाकार दमदार भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय प्रणव पिंपळकर या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

Tags: Chinmay MandlekarInstagram PostOfficial TeaserUpcoming Marathi FilmYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group