हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वात बोल्ड सिन देणे हा प्रकार काही वेगळा नाही. बोल्ड सिन देणाऱ्या कलाकारांकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन आखला जातो ते मात्र काही योग्य नाही. कारण आधुनिकतेनुसार चित्रीकरण बदलणं आणि प्रेक्षकांना अपेक्षित ते देणं हेच इंडस्ट्रीचं काम आहे. हॉलिवूड आणि बॉलिवूड यासाठी आधीच ओळखले जातात तर मराठी चित्रपटांमध्येही असे काहीसे सिन आजकाल दिले जातात. आता चित्रपटांसह वेब सिरीज देखील प्रेक्षकवर्ग ओढण्यात यशस्वी होताना दिसत आहे. मग वेब सिरीज मागे कशा राहतील..? अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माली अशीच काहीशी वेब सिरीज घेऊन येत आहेत. ज्याचे शीर्षक ‘रानबाजार’ असे आहे.
प्लँनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मकडून सध्या दर्जेदार कलाकृतींची निर्मिती केली जात आहे. पण नुकतंच त्यांनी एका वेब सिरीजची घोषणा केली आहे ज्याचे नाव ‘रानबाजार’ असे आहे. या वेब सिरीजचे नाव जितके वेगळे आहे त्याचे टिझरही तितकेच लक्षवेधी. या टीझरमध्ये बोल्ड आणि बिंदास तेजस्विनी पंडीतसह सोज्वळ आणि सुंदर प्राजक्ता माळीचे अत्यंत बोल्ड सीन दाखवण्यात आले आहेत.
या टिझरमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित चक्क विवस्त्र होताना दिसतेय तर प्राजक्ता माळीचा प्रणय प्रसंग करताना दिसते आहे. निश्चितच यावर विश्वास ठेवणे कठीण आहे पण हेच खरे आहे. हि वेब सिरीज काहीतरी नवीन धमाका घेऊन येतेय. मुख्य म्हणजे यांच्या कॅप्शनमध्ये स्पष्ट लिहिलंय कि, वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.
वेबविश्वाला हादरवून टाकणाऱ्या या ‘रानबाजार’चा ट्रेलर येत्या १८ मे २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्यातरी या टीझरची चांगलीच चर्चा आहे. तेजस्विनीचा टिझर रिलीज करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, एकदा लोकांची सेवा करून पाहिली … एकदा प्रेमात त्याग करूनही पाहिला …एकदा बदलाही घेतला ..! आता मात्र फसत चाललीय…सत्तेच्या जाळ्यात अडकलेल्या एका फुलपाखरासारखी…. तर प्राजक्ताचा टिझर रिलीज करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, आजवर आपण तिला अनेक भूमिका साकारताना पाहिलं.. एक कलाकार म्हणून स्वतःला एका चौकटीत न बांधता आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या संपूर्ण विरोधी भूमिका साकारण्याचा प्रयत्न प्राजक्तानं ‘रानबाजार’ मध्ये केलाय.. या दोन्ही पोस्ट तेजस्विनीने आपल्या इंस्टावर केल्या आहेत. या टीझरवरून स्पष्ट समजतंय कि, अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी या वेब सिरीज मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. तर दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केले आहे.
Discussion about this post