Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘गेल्या जन्मात तिने पाप केलं असणार..’; श्रिया पिळगांवकरच्या आगामी शॉर्टफिल्मचा टीझर प्रदर्शित

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 25, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Sita - Short Film
0
SHARES
88
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडी अभिनेते सचिन पिळगावकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकरदेखील मनोरंजन विश्वाचा एक भाग आहे. आतापर्यंत तिने काही मराठी, हिंदी चित्रपट तसेच विविध धाटणीच्या वेबसिरीजमध्ये अव्वल भूमिका साकारून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने चकित करण्यासाठी श्रिया सज्ज झाली आहे. श्रिया लवकरच एका शॉर्ट फिल्ममध्ये अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेतील तिचे पोस्टर आणि शॉर्ट फिल्मचा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shriya Pilgaonkar (@shriya.pilgaonkar)

अभिनेत्री श्रिया पिळगावकरने ‘मिर्झापूर’, ‘द ब्रोकन न्यूज’, ‘गिल्टी माइंड्स’, ‘ताजा खबर’ अशा अनेक वेब सिरीजमध्ये विविध ढंगाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. त्यामुळे ओटीटी विश्वात श्रियाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या पाठोपाठ आता श्रिया ‘सीता’ या आगामी शॉर्ट फिल्ममध्ये महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या शॉर्टफिल्मचे पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. यामध्ये श्रिया भगव्या रंगाच्या साडीमध्ये दिसतेय. तसेच तिचा संन्यासी अवतार मात्र हातात तान्ह बाळ असा वेगळाच लूक समोर आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये तिच्या भूमिकेविषयी जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.

View this post on Instagram

A post shared by Shriya Pilgaonkar (@shriya.pilgaonkar)

अद्याप हि शॉर्टफिल्म कशावर भाष्य करते आहे याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र आपल्या आगामी शॉर्टफिल्ममधील आपल्या भूमिकेविषयी बोलताना अभिनेत्री श्रिया पिळगावकर म्हणाली कि, ‘मी खूप शॉर्टफिल्म्स पाहिल्या आहेत. पण मी एका उत्तम स्क्रिप्टची वाट बघत होते. सीता ही एक अत्यंत ताकदवान कथा आहे. माझ्या पात्राचं नाव मैथिली आहे जी त्या लहान मुलाशी संवाद साधत आहे. जिला एका लहान मुलीचं शव मिळालं आहे. ही शॉर्टफिल्म तुमच्या विचारांना खाद्य पुरवणारी आहे’. ‘सीता’ ही शॉर्टफिल्म अभिनव यांनी दिग्दर्शित केली असून हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळणार आहे.

Tags: Instagram PostMarathi ActressSHORTFILMShriya Pilgaonkarviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group