हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बिहारमधील गुन्ह्यांची संख्या आणि वाढत गुन्हेगारी विश्व याविषयी आपण अनेकदा वृत्त वाचत, पाहत असतो. या गुन्हेगारी विश्वाची भुरळ कायमच कथाकारांना पडली आहे. तर बिहारमधील सत्य घटनांवर आधारित सिरीज लवकरच आपल्या भेटीला येत आहे. या सीरिजचे नाव आहे ‘जहानाबाद’. नुकताच या वेबसीरिजचा टीझर प्रदर्शित झाला आहे आणि हा टिझर पाहून भल्या भल्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. सत्य घटनांवर भाष्य करणारी आणि बिहारच्या गुन्हेगारी विश्वावर बेतलेली हि सिरीज घडून गेलेल्या त्या घटनांची आठवण करून देईल ज्या घटनेने काहींना आयुष्यभराच्या जखमा दिल्या आहेत.
When love and violence crossed paths.#Jehanabad – Of love & war, streaming soon, on Sony LIV#JehanabadOfLoveAndWar #JehanabadOnSonyLIV pic.twitter.com/NYku4AjkiH
— Sony LIV (@SonyLIV) December 28, 2022
‘जहानाबाद’ या क्राईम बेस्ड सिरींजचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून या टीझरमध्ये सुरुवातीला २ माणसं मोटर सायकलवर महेंद्र सिंग धोनीविषयी चर्चा करताना दिसत आहेत. त्यानंतर थोड्यावेळाने त्यांचा विषय धोनीच्या जातीपर्यंत येतो. मग हि चर्चा भीषण स्वरूप घेते आणि चर्चेचे टोक इच्छित स्थळी पोहोचल्यावर मोटर सायकलवर मागे बसलेला एक माणूस पिशवीतून बॉम्ब काढून जवळच्या आवारात फेकतो. यामुळे ब्लास्ट होतो आणि हे पाहून फाटकामधून काही पोलिस अधिकारी बाहेर येतात. त्यांना रस्त्यावर एक पिशवी पडलेली आढळते. हि पिशवी ते उघडून पाहतात तर त्यात एका मेलेल्या माणसाचं मुंडकं कापून ठेवल्याचं समोर येत. या घटना वाचताना किंवा ऐकताना जितक्या भीषण तितक्याच पाहणाऱ्यांच्या थरकाप उडविणाऱ्या आहेत.
‘जहानाबाद’ ही वेबसीरिज २००५ साली बिहारमध्ये घडलेल्या काही सत्य घटनांवर आधारित आहे. हा टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. ही वेबसीरिज लवकरच सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचे कर्ताधर्ता सुधीर मिश्रा असून राजीव बर्नवाल आणि सत्यांशू सिंग यांनी सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. शिवाय ऋत्विक भौमिक, हर्षिता गौर, परमब्रत चट्टोपाध्याय, रजत कपूर हे कलाकार यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Discussion about this post