Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘वाघ आहे वाघ.. खाऊन टाकीन’; पब्लिकच्या मनाचं ट्रॅफिक जॅम करायला आलाय ‘चौक’चा रोमांचक टिझर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 21, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Chowk
0
SHARES
5k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित ‘चौक’ या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या टीझरमधून कलाकारांच्या भूमिकांची पहिली झलक समोर आली आहे आणि मुख्य म्हणजे काही डायलॉग्सने लक्ष वेधून घेतले आहे. या टीझरची सुरूवात भव्य गर्दीने होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारी गर्दी, मैत्री, वाद, चर्चा हे सगळे एका चौकातलं समीकरण या चित्रपटातून दिसणार आहे. या सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या ‘चौक’चा टिझर सोशल मीडिया गाजवताना दिसतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Planet Marathi प्लॅनेट मराठी (@planet.marathi)

या चित्रपटात प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, किरण गायकवाड, स्नेहल तरडे, सुरेश विश्वकर्मा, संस्कृती बालगुडे, अक्षय टंकसाळे, शुभंकर एकबोटे, सुनिल अभ्यंकर, अंजली जोगळेकर असे तगडे कलाकार हटके भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट एक मल्टिस्टारर सिनेमा आहे. टीझरमध्ये सुरुवातीला उपेंद्र लिमये यांचा ‘वाघ आहे वाघ.. खाऊन टाकीन’ हा संवाद अन शेवटी किरण गायकवाडचा ‘एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार’ हा संवाद विशेष लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Planet Marathi प्लॅनेट मराठी (@planet.marathi)

अभिनेता व दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड यांनी चित्रपटाचे लेखन, संवाद, कथा, पटकथा या सर्व गोष्टींवर अत्यंत बारकाईने काम केले आहे. या चित्रपटात प्रविण तरडे, रमेश परदेशी पुन्हा एकत्र दिसणार आहेत. तर उपेंद्र लिमये यांचा रांगडा अंदाज कमालीचा भाव खाताना दिसतो आहे. मुख्य म्हणजे ‘चौक’च्या निमित्ताने अभिनेता किरण माने पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘चौक’ची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) यांनी केली आहे. तर दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे.

Tags: Instagram Postkiran gaikwadOfficial TeaserUpcoming Marathi MovieViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group