Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘द ट्रायल- प्यार.. कानून.. धोका’; काजोलच्या पहिल्या वेब सिरीजचा दमदार ट्रेलर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 12, 2023
in Hot News, Trending, बातम्या, वेबसिरीज, व्हिडिओ, सेलेब्रिटी
The Trial
0
SHARES
38
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेत्री काजोलने आजतागायत अनेक सिनेमांमधून विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. तिच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. मोठा पडदा गाजवल्यानंतर आता काजोलने ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार पदार्पण केले आहे. ‘द ट्रायल – प्यार, कानून, धोका’ या आगामी वेब सीरिजमधून ती ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिरीजचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

या सीरिजमध्ये अभिनेत्री काजोल हि ‘नोयोनिका सेनगुप्ता’ ही भूमिका साकारते आहे. या सिरीजमध्ये नोयोनिका सेनगुप्ताचे पती अतिरिक्त न्यायाधीश राजीव सेनगुप्ता यांना लाच म्हणून लैंगिक संबंधांची मागणी केल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात येते. आपल्याच पाटील सेक्स स्कॅण्डल प्रकरणी अटक झाल्यावर नोयोनिकाला धक्का बसतो. मात्र तिच्यावर दोन मुलींची जबाबदारी असते. त्यामुळे ती पुन्हा एकदा वकील म्हणून कामावर रुजू होण्याचा निर्णय घेते. दरम्यान तिचा पती तिलाच आपली केस लढण्याची विनंती करतो.. मग पुढे काय होतं..? हे जाणून घेण्यासाठी ‘द ट्रायल…’ हि सिरीज पहावी लागेल. तूर्तास ट्रेलरमध्ये इतकेच दाखवण्यात आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

‘द ट्रायल- प्यार, कानून, धोका’ या वेब सीरिजचा ट्रेलर २ मिनिटांचा असला तरीही एक क्षणभरदेखील नजर हटू देत नाही. जर ट्रेलर इतका जबरदस्त आहे तर सिरीज किती उत्कंठा वाढवणारी असेल याचा अंदाज इथेच येतोय. या सिरीजमध्ये काजोल नेहमीपेक्षा एका वेगळ्या आणि हटके भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे काजोलचे प्रेक्षक या सिरीजबाबाबत उत्सुक आहेत. काजोलची ‘द ट्रायल- प्यार, कानून, धोका’ ही आगामी सीरिज येत्या ४ जुलै २०२३ रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

Tags: Bollywood ActressDisney Plus HotstarInstagram PostkajolViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group