Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रियांका चोप्राच्या स्पाय थ्रिलर ‘सिटाडेल’ सिरीजचा ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 7, 2023
in Hot News, Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, वेबसिरीज, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Citadel
0
SHARES
142
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची पिग्गी चॉप्स अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने फक्त बॉलिवूडचं नाही तर हॉलिवूड सिने विश्वातही आपल्या अभिनयाने लख्ख प्रकाश पाडला आहे. येत्या काळात लवकरच प्रियांकाची ‘सिटाडेल’ हि स्पाय थ्रिलर वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिरीजमधील प्रियांकाच्या भूमिकेचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर आता या स्पाय थ्रिलर सिरीजचा ट्रेलरदेखील प्रदर्शित झाला आहे. अगदी काही तासांमध्येच या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून त्याचे व्ह्यूज मिलियनमध्ये पोहोचले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका चोप्राच्या आगामी सिरीज ‘सिटाडेल’ च्या ट्रेलरमध्ये तिची एक दमदार झलक पहायला मिळतेय. हि सिरीज अॅक्शनने भरलेली एक स्पाय थ्रिल स्टोरी आहे. त्यामुळे यामध्ये जबरदस्त अॅक्शन सीन्स, थरार आणि भरपूर रोमान्स पहायला मिळणार आहे. या सीरिजच्या २ एपिसोडचे प्रीमियर हे येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार आहे. यानंतर पुढे २६ मे २०२३ पर्यंत दर शुक्रवारी या सिरीजचा एक नवीन एपिसोड प्रदर्शित केला जाणार आहे. या सिरीजचा ट्रेलर इतका उत्कंठावर्धक आहे कि प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

या वेबसीरिजचे कथानक ‘सिटाडेल’ नावाच्या एका जगातील गुप्तचर संस्थेवर अर्थात एका स्पाय एजन्सीवर आधारित आहे. जी ८ वर्षांपूर्वीच नष्ट झाली आहे. ही एजन्सी लोकांचे संरक्षण करते, मात्र मॅन्टीकोरने ती नष्ट केली होती. सिटाडेल नष्ट होताना मेसन केन आणि नादिया सिंह हे त्याचे मुख्य एजंट आपला जीव वाचवून पुढे आपली नवी ओळख निर्माण करून आयुष्य जगू लागले.

View this post on Instagram

A post shared by Citadel (@citadelonprime)

मात्र एका रात्री बर्नार्ड ऑर्लिक (स्टॅनली टुसी) ज्याने पूर्वी मेसनबरोबर सिटाडेल इथं काम केले होते, तो त्यांना शोधून काढतो आणि एका नव्या मिशनला सुरुवात होते. मॅसनला मॅन्टीकोरला थांबवण्यासाठी नादियाची गरज असते आणि इथून एका सुरु झालेलं हे मिशन या सीरिजची कथा आहे. यामध्ये स्टेनली टुकी, लेस्ली मॅनव्हिलसह रिचर्ड मॅडन आणि प्रियांका चोप्रा जोनास यांच्या मुख्य भूमिका आहेत. रुसो ब्रदर्स AGBO आणि शो-रनर डेव्हिड वील यांनी या वेबसीरिजची निर्मिती केली आहे.

Tags: citadelhollywoodInstagram PostOfficial TrailerPriyanka ChopraUpcoming Web Series
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group