Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ओहो!! रोमान्स.. अ‍ॅक्शन.. फुल्ल राडा; सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चा ट्रेलर पहा 

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 11, 2023
in Hot News, Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kisi Ka bhai Kisi Ki jaan
0
SHARES
750
VIEWS
WhatsAppFacebookTwitter
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा आगामी सिनेमा ‘किसी का भाई किसी की जान’ ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची गेले अनेक दिवस चर्चा रंगली असून चाहते भाईजानला भेटायला फारच उत्सुक आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’चा टीझर आणि गाणी चाहत्यांनी डोक्यावर उचलून घेतली आणि त्यानंतर आता सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सोशल मीडियावर हा ट्रेलर चांगलाच व्हायरल होतो आहे. चाहते या ट्रेलरला तुफान पसंती देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा अत्यंत बहुप्रतीक्षित सिनेमांपैकी एक आहे. सलमान खानचा सिनेमा म्हटल्यावर चाहते आधीच खुळावले आहेत. त्यात आता ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि यामध्ये भाईजानचा जबरदस्त अंदाज पाहून सिनेमाबाबतची उत्सुकता आणखीच वाढली आहे. सलमान खान या वयातही सिनेमात जबरदस्त अँक्शन करताना दिसतो आहे. सोबतच साऊथ स्टार्समूळे सिनेमाला चार चाँद लागले आहेत. या ट्रेलरमध्ये ऍक्शन, कॉमेडीसह सलमान खान आणि पूजा हेगडेच्या रोमँटिक केमिस्ट्रीची झलकदेखील दिसते आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

मुख्य म्हणजे या सिनेमात सलमान खानचा एक हटके साऊथ लूक पहायला मिळतो आहे. एकंदर हा सिनेमा एक फुल्ल पॅकेज्ड ड्रामा आहे. त्यामुळे आता रिलीजची प्रतीक्षा आणखीच शिगेला पोहोचली आहे. ‘किसी का भाई किसी की जान’च्या ट्रेलरमध्ये सलमान खान, दग्गुबती व्यंकटेश, पूजा हेगडे, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल, भूमिका चावला, शेहनाज गिल, जस्सी गिल, पलक तिवारी यांचीही झलक पाहायला मिळत आहे. विशेष सांगायचे म्हणजे भाईजानच्या या सिनेमामध्ये साऊथ स्टार व्यंकटेश सोबत अभिनेता जगपती बाबूदेखील दिसतो आहे. इतकेच नव्हे तर जगपती बाबू आपल्याला मुख्य व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या २१ एप्रिल २०२३ रोजी ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
Tags: Bollywood Upcoming MovieInstagram PostKisi ka Bhai Kisi Ki JaanOfficial TrailerSalman Khan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group