Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तू नसताना तुझ्या आठवणी अन..’; पहिल्या प्रेमाची हळवी गोष्ट घेऊन येतोय ‘गेट टुगेदर’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 13, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Get Together
0
SHARES
89
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या गेट टुगेदर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. रोमान्स, हळुवारपणा, अल्लडपणाचे अनेक रंग या ट्रेलरमध्ये पहायला मिळत असून, हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होत आहे. सतनाम फिल्म्स प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलं आहे.

‘गेट टुगेदर’ या चित्रपटाचे संगीत अजय रणपिसे यांनी दिलं आहे. तर एकनाथ गिते, त्रिशा कमलाकर, श्रेया पासलकर, इमरान तांबोळी, संजना काळे, मिताली कोळी, सुशांत कोळी, साकिब शेख हे कलाकार या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तर चित्रपटातील जी गाणी सध्या सोशल मीडियावर प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत त्या गाण्यांना प्रियंका बर्वे, जावेद अली, शंकर महादेवन या गायकांचे सुरेल स्वर लाभले आहेत. या गाण्यांना समाज माध्यमांतून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Get Together Marathi Film (@gettogethermarathifilm)

आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा, कॉलेजमध्ये गवसतं. पण हे प्रेम यशस्वी होतंच असं नाही. पण पहिलं प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर या चित्रपटाचा ट्रेलर नव्याने करून देतो. रोमान्स, भावभावनांचा कल्लोळ या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. शाळा, कॉलेजमध्ये पहिल्या प्रेमासाठी केली मजामस्ती, त्यावेळचा अल्लडपणा, हळवेपणा पुढे पुढे या नात्याला अनेक रंग कसे येत जातात याची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टूगेदर हा चित्रपट नक्कीच करून देईल.

Tags: Instagram PostOfficial TrailerUpcoming Marathi MovieViral VideoYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group