हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल अभिनित ‘IB71’ या आगामी पॅट्रिऑटिक सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. संकल्प रेड्डी दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर साधारण २ मिनिटांचा असंला तरीही क्षणात उत्सुकता वाढवताना दिसतो आहे. हा चित्रपट येत्या १२ मे २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाची पूर्ण कथा सत्य घटनेवर आधारित असून १९७१ मधील एका मोठ्या सिक्रेट मिशनवर आधारलेली आहे. या मिशनची एक झलक आपल्याला ट्रेलर मध्ये पहायला मिळत आहे.
या धमाकेदार ट्रेलरची सुरुवात एका विमानापासून होते. जे विमान हायजॅक झालं आहे. या विमानाचा IB एजंट विद्युत जामवाल हा पायलट आहे. विमान क्रॅश होणार या भीतीने प्रवासी घाबरून जातात आणि अनेक जण त्याला लँडिंग रद्द करण्याचा सल्ला देतात. दरम्यान १९६५ च्या युद्धानंतर १९७१ मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची मोठी तयारी केली होती. हा हल्ला थांबवण्याची ही साहस कथा आहे. या मिशनमध्ये ३ राष्ट्रांचा सहभाग आहे आणि ३० एजंटने १० दिवसांत या १ मिशनवर काम करत आहेत. पाकिस्तानावावर विजय मिळवणारी हि गोष्ट तब्बल ५० वर्षे कित्येकांना ज्ञात नव्हती. आता हीच कथा अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
या सिनेमाच्या माध्यमातून १९७१ साली झालेल्या भारत – पाकिस्तान युद्धाचे साक्षीदार होण्याची संधी प्रेक्षकांना मिळते आहे. हि कथा, हा थरार सर्व काही रुपेरी पडद्यावर अनुभवता येणार आहे. मुख्य म्हणजे या दमदार सिनेमामध्ये अनेक ॲक्शन सीन पहायला मिळतील. या सिनेमातून अभिनेता विद्युत जामवाल अभिनयासोबतच निर्माता म्हणून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात अनेक दिग्गज कलाकार मंडळी आहेत. ज्यामध्ये अनुपम खेर यांचाही समावेश आहे.
Discussion about this post