Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘महामारीमध्ये माणुसकी शिकली नाही तर..’; मनपरिवर्तन करणाऱ्या ‘अनलॉक जिंदगी’चा ट्रेलर आऊट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 28, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Unlock Zindagi
0
SHARES
32
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दोन वर्षांपूर्वी साऱ्या जगावर एक मोठे संकट आले, कोरोना महामारीचे. अवघ्या काही दिवसांतच या महामारीने जगभर हाहाकार माजवला. कोरोनाच्या विळख्यात आपण असे अडकलो की, संपूर्ण जग ठप्प झाले. शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, उद्योगधंदे, मंदिरे, दळणवळणाची साधने. संपूर्ण जगच थांबले. निर्मनुष्य रस्ते पाहून जीव घाबराघुबरा व्हायचा. लोकांचे एकमेकांना भेटणे थांबले. या महामारीत कित्येकांनी आपले प्राण गमावले, अनेकांचे भावनिक, आर्थिक, अशा सगळ्याच बाजूने नुकसानही झाले. आजही हे भयाण वास्तव आठवले, की अंगावर काटा येतो.

लॉकडाऊनमधील ही परिस्थिती लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. रियल रील्स प्रस्तुत, राजेश गुप्ता निर्मित, दिग्दर्शित ‘अनलॉक जिंदगी’ या चित्रपटाचे नुकतेच ट्रेलर लाँच झाले असून या चित्रपटात पितोबाश त्रिपाठी, राजेश गुप्ता, देविका दफ्तरदार, शिवानी सुर्वे, इंदिरा कृष्णा, हेमल देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘अनलॉक जिंदगी’चे लेखन आणि संवादही राजेश गुप्ता यांचेच असून गीतकार नुसरत फतेही अली खान, राजेश गुप्ता आहेत.

View this post on Instagram

A post shared by Real Reels (@real.reels.movies)

ट्रेलरमधील पहिलाच सीन काळजाचा ठोका चुकवणारा आहे. यात एक स्वार्थी व्यावसायिक, फ्रँटलाईन वर्कर,त्याची काळजी करणारी बायको, गृहिणी, दोन असाह्य स्त्रिया यांची कहाणी पाहायला मिळणार आहे. या सगळ्यांचे आयुष्य समांतर जात असतानाच प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत. ट्रेलरमध्ये माणुसकीचा खरा चेहरा समोर आणणारी अनेक दृश्ये यात दिसत आहेत. कठीण प्रसंगात रक्ताची नाती कशी मागे फिरतात आणि अनोळखी कसे मदत करतात, याचे दर्शनही यातून होत आहे. माणसाच्या मनाचे परिवर्तन करणाऱ्या या चित्रपटाची लंडन, मेक्सिको, पॅरिस आणि टोरांटो फिल्म फेस्टिवलमध्येही निवड झाली आहे. येत्या १९ मे रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Tags: Bollywood Upcoming MovieInstagram PostShivani SurveViral VideoYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group