Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ओहो.. बिग बॉस ओटीटीच्या घरात हाय होल्टेज ड्रामा; कनेक्शन्स तुटले आणि वातावरण पेटले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 26, 2021
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून नव्या कोऱ्या फॉरमॅटसह सुरु झालेला बिग बॉस ओटिटीचा खेळ आता चांगलाच रंगात आला आहे. पहिल्या दिवशी घरात टिकून राहण्यासाठी जोडलेले काही कनेक्शन्स तडातड तुटताना दिसले आणि बिचारे स्पर्धक रडताना दिसले. यात शमिता-राकेश, निशांत-मूस आणि दिव्‍या-झीशान याचे कनेक्शन्स कायम राहिले पण प्रतीक-अक्षरा यांसोबत नेहा-मिलिंद या २ जोड्या तुटल्या आणि प्रतीक-नेहा व मिलिंद-अक्षर अश्या जोड्या तयार झाल्या. यानंतर घरातली समीकरणे अशी बदलली कि खूप मोठा ड्रामाच घडला. गेल्या सोमवारी घरातील कनेक्‍शन्‍सना त्‍यांचे कनेक्‍शन्‍स बदलून नवीन कनेक्‍शन सुरू करण्‍याची संधी मिळाली आणि कनेक्शन्स बदलताच सगळ्यांचे रंग बाहेर येऊ लागले आहेत. या दरम्यान बिग बॉस ओटीटीच्या घरात ड्रामा, हृदयभंग, वादविवाद, अपमान सगळं काही बघायला मिळालं.

View this post on Instagram

A post shared by Voot (@voot)

बिग बॉसचा गेम ऑफ हार्ट्स हा टास्क प्रतीक व अक्षरासाठी काहीसा चांगला ठरला नाही. कारण आधी प्रतीकने मनापासून अक्षराचा स्‍वीकार केला आणि त्‍यानंतर एकदा नव्हे दोनदा तिचा हृदयभंग केला. यानंतर काय तर, नेहाला प्रतीक आणि अक्षराला मिलिंद आवडू लागला. परिणामी या दोन प्रबळ आणि सक्षम महिलांमध्‍ये बाचाबाचीतली ढिशुम ढिशुम सुरु झाली. मग प्रतीक यामागील कारण सांगत म्‍हणाला, “अक्षरा आणि गाबा यांच्‍यामध्‍ये उत्तम कनेक्‍शन आहे, ज्‍यामुळे त्‍यांनी एकत्र आले पाहिजे. मग काय अक्षरा गप्प बसणार होती? तिनेही प्रत्‍युत्तर देत म्हटले, “मला कोण आवडू लागल आहे, हे दुसरे कोणी ठरवू शकत नाही.” त्‍यानंतर नेहाला प्रतीक आवडतोय हे समजल्‍यावर मिलिंद गाबाचीही तार सटकली आणि ती म्हणाला, “मला तर धक्‍काच बसला आहे. इतक्‍या लवकर तर अंड शिजून पलटता येत नाही, जितक्‍या लवकर तुम्‍ही पलटला आहात.”

View this post on Instagram

A post shared by Voot (@voot)

यानंतर हा बोली बोलीचा वादविवाद उच्चांकावर पोहोचला आणि मग नेहा भसीन म्‍हणाली, “मी एक खोटे कनेक्‍शन बनवणार नाही. मी तुझ्यासोबत असताना माझ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनाने पाहिले जात आहे. यावर क्षणाचाही विलंब न करता मिलिंद गाबाने प्रत्‍युत्तर दिले, कि “तोंड सांभाळून बोल”. मग पुन्हा यावर नेहा म्‍हणाली, “तुला माझ्याबाबत अश्या पद्धतीने बोलण्‍याचा अधिकार नाही. मी हे सहन करू शकत नाही.” यानंतर नेहा आणि अक्षर या दोन महिला एकमेकांसोबत भिडल्या. पुढे टास्‍क संपताक्षणी अक्षराने ततिचे प्रतिकसोबतचे कनेक्‍शन मोडण्‍यासाठी नेहाला दोषी मानले. दरम्यान अक्षरा नेहाला बोलताना म्‍हणाली, “तुम्‍ही माझे आणि प्रतीकचे कनेक्‍शन तोडू शकत नाही. तुम्‍ही एक हृदय तोडू शकता, पण माझ्या मनामध्‍ये असलेले तोडू शकत नाही.” हे असे सगळे एकीकडे सुरु होऊन दुसरीकडे येऊन संपले आणि प्रेक्षकांनी याची पुरेपूर मजा लुटली.

Tags: Akshara SinghBigg Boss OTTMilind GabaNeha BhasinPratik SehajpalVoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group