हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या शुक्रवारी दिनांक २० जानेवारी २०२३ रोजी ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट संपूर्ण राज्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन ‘आटपाडी नाईट्स’चे नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी केले आहे. तर विनोद नाईक कार्यकारी निर्माते आहेत. सानवी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि आरती चव्हाण यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
या चित्रपटात अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता ओंकार भोजने हे मुख्य भूमिकेत आहेत. दोघांचाही चाहता वर्ग चांगला असला तरीही चित्रपटाला म्हणावं तास प्रतिसाद मिळत नाहीये. या चित्रपटाला प्राईम टाईम मिळत नसल्याचे बोलले जात आहे. याबाबत ईशाने नुकतेच इंस्टाग्रामवर आपले मत मांडले आहे.
याबाबत बोलताना इशा केसकरने म्हटले आहे कि, ‘सध्या राज्यात अनेक ठिकाणी चित्रपटाला स्क्रिन्स मिळत नाही. आम्ही चित्रपट प्रदर्शनाची घाई केली. त्यामुळे अनेक ठिकाणी शो कमी आहेत. जो वेळ आम्हाला मिळाला त्यावेळेत आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचू असे वाटलं होतं. पण तसं झालं नाही. शेवटी एका हाताने टाळी वाजत नाही. आम्हालाही प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात उशीर झाला. आम्ही प्रेक्षकापर्यंत तेवढे पोहोचू शकलो नाही. त्यांना तितकंस पटवून देऊ शकलो नाही’.
पुढे म्हणाली कि, ‘‘वेड’ या मराठी चित्रपटासाठी ज्या प्रकारे प्रमोशन करण्यात आलं, तितकं आम्हाला करता आलं नाही. त्यात आम्ही मागे पडलो आणि म्हणून आम्हाला स्क्रीन दिल्या गेलेल्या नाही. पण प्रेक्षकांना जर चित्रपटाला प्रतिसाद देत असतील तर अजून स्क्रीन मिळाव्यात यासाठी मी स्वत: पुढाकार घेईन. विविध शहरात हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, याला दोन तरी शो मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करु. आमच्या चित्रपटाबरोबर अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे स्पर्धा खूप आहे. तरीही आमचे निर्माते आणि दिग्दर्शक खूप प्रयत्न करत आहेत’.
Discussion about this post