हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आता २०२१ संपले म्हणजे मनोरंजनाला ब्रेक लागणार असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सपशेल चूक आहात. असे म्हणण्याचे कारण म्हणजे, हे नवीन वर्ष २०२२ आणखी मनोरंजनाचे, हास्याचे आणि हवेहवेसे वाटणारे धमाके घेऊन येणार आहे. या वर्षात बॉलिवूडसह मराठी इंडस्ट्रीतही नॉन स्टॉप मनोरंजन जारी असणार आहे. कारण मराठी अभिनेता अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘लोच्या झाला रे’ हा धमाकेदार विनोदी कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अलीकडेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्येही विशेष उत्सुकता आहे.
या नवीन वर्षात आम्ही हसणार आणि तुम्हा सर्वांना पोट धरून हसवणार.
टीम #LochyaZaalaRe कडून सर्वांना नव्या वर्षाच्या भरभरून शुभेच्छा! #HappyNewYear @lochyazaalare#InTheatres11Feb
A Film By @ParitoshPainter @raviadhikari25@SayajiShinde @imAnkush @vaidehiofficial pic.twitter.com/C8kcA3dFiX— SIDDHARTH JADHAV 🇮🇳 (@SIDDHARTH23OCT) January 1, 2022
माहितीनुसार, सुरेश जयराम यांच्या नाटकावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर अतिशय चर्चेत आहे. या पोस्टरवरून समजते कि, हा एक विनोदी चित्रपट असणार आहे आणि नक्कीच हा पॉट धरून हसवणार आहे. आता शीर्षकामुळे इतकं तर समजतंय कि लोच्या झालाय.. पण नेमका कुणाच्या आयुष्यात लोच्या झाला आहे? हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पहावा लागणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन परितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी केले आहे. परितोष यांनी यापूर्वी बॉलिवूड चित्रपट धमाल, टोटल धमाल अशा चित्रपटांचे लेखन केले आहे. शिवाय या चित्रपटाचे छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केले आहे. त्यांनी याआधी झिम्मा, हिरकणी, हाफ तिकीट या सुपरहिट मराठी चित्रपटांचे छायाचित्रण केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती नवीन चंद्रा, नितीन केणी, परितोष पेंटर व शांताराम मनवे यांनी केली आहे आणि मंगेश रामचंद्र जगताप हे कार्यकारी निर्माता आहेत.
लोच्या झाला रे या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये चित्रित झाले आहे. ‘मुंबई मुव्ही स्टुडिओ प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनय मुंबई प्रोडक्शन’ अंतर्गत हा चित्रपट बनवण्यात आला असून याच्या वितरणाचे काम यूएफओ मुव्हिझकडे आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी, सयाजी शिंदे यांच्यासह विजय पाटकर, प्रसाद खांडेकर आणि रेशम टीपणीस यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
हा चित्रपट येत्या ११ फेब्रुवारी २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे कुणाचा लोच्या झालाय हे पाहायचं असेल तर जरूर पहा..’लोच्या झाला रे’
Discussion about this post