हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या शनिवारी एका महिला पत्रकाराने आपल्या फोटोंमध्ये बदल करून वेबसाईटवर अपलोड करीत त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. यामध्ये मुस्लिम महिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही तिने म्हटले होते. त्यानंतर कडव्या आणि बोचक कार्यकर्त्यांकडून या वर्षभरात घालेली हि दुसरी घटना आहे असे तिने तक्रारीत सांगितले. यानंतर संबंधित ऍपवर बंदी घालून त्याचा लवकरच पूर्ण तपास करण्यात येईल, असे ट्विट माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले. याच मुद्यावरून बॉलिवूड पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी थेट देशाच्या पंतप्रधानांवर निधन साधला आहे. अख्तर म्हणाले, एकीकडे महिलांचा ऑनलाइन लिलाव होत आहे आणि दुसरीकडे धर्म संसदेत हत्याकांडाची चर्चा होत आहे. काय हाच देशाचा विकास आहे?
There is an online auction of hundred women There are so called Dharm Sansads , advising the army the police n the people to go for the genocide of almost 200 MLN Indians .I am appalled with every one ‘s silence including my own n particularly of The PM . Is this Sub ka saath ?
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) January 3, 2022
गीतकार जावेद अख्तर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया ट्विटर हँडलवर एक ट्विट केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘शेकडो महिलांचा ऑनलाइन लिलाव होत आहे. तथाकथित धर्म संसदे आहेत, जे लष्कराला आणि लोकांना सुमारे २०० एमएलएन भारतीयांच्या नरसंहारासाठी जाण्याचा सल्ला देत आहेत. माझ्या स्वतःच्या आणि विशेषत: भारतीयांसह प्रत्येकाच्या मौनाने मी घाबरलो आहे. विशेष करून पीएम मोदी यांच्या मौनाने जास्तच. काय पीएम मोदी यांचा हाच का तो ‘सब का साथ?’ असं म्हणत त्यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
Govt. of India is working with police organisations in Delhi and Mumbai on this matter. https://t.co/EOLUb0FlQe
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) January 2, 2022
दरम्यान फिर्यादीनुसार, इंटरनेटवर मुस्लिम धर्मीय महिलांना त्रास देण्यासाठी आणि त्यांचा अपमान करण्यासाठी उत्सुक व दोषी व्यक्ती समुहावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या फिर्यादीत लिहिले आहे कि, बुलीबाई डॉट गितहब डॉट आयओ या वेबसाईटवर माझा फोटो पाहून सकाळी मला धक्काच बसला. त्यावर माझे छायाचित्र अयोग्य स्वरूपात, अस्वीकारार्ह रुपात आणि अत्यंत चुकीच्या पध्दतीने वापरले होते. या मागे मी आणि माझ्या सारख्या स्वतंत्र, पत्रकार महिलांना त्रास देण्याचा हेतू स्पष्टपणे दिसतोय. त्यामुळे यावर लवकरात लवकर कारवाई करावी.
Discussion about this post