हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पद्मविभूषण प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे निधन झाल्याची दुःखद वार्ता मिळत आहे. माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. दरम्यान ते ८३ वर्षाचे होते. रविवारी आणि सोमवारच्या मध्यरात्रीस त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याबाबत त्यांचा नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. यानंतर संपूर्ण इंडस्ट्रीमधूनदेखील शोक व्यक्त केला जात आहे. गायिका मालिनी अवस्थी आणि गायक अदनान सामी यांनीही सोशल मीडियाद्वारे पंडितजींना श्रद्धांजली वाहिली आहे.
Kathak maestro Pandit Birju Maharaj passes away, says his relative
(File photo) pic.twitter.com/jabPHX1cly
— ANI (@ANI) January 17, 2022
बिरजू महाराज यांचा जन्म लखनौ येथील एका घराण्यात ४ फेब्रुवारी १९३८ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव पंडित बृजमोहन मिश्रा आहे. ते एक उत्तम कथ्थक नर्तक असण्यासोबतच शास्त्रीय गायकदेखील होते. पंडितजींचे वडील आणि गुरु अच्छन महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे देखील प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते. पंडितजींनी देवदास, देढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन केले आहे. याशिवाय सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटाला त्यांनी बहारदार संगीत प्रदान केले होते.
He was under treatment for the past month. He had sudden breathlessness at around 12:15-12:30 am last night; we brought him to the hospital within 10 mins, but he passed away: Ragini Maharaj, granddaughter of Kathak maestro Pandit Birju Maharaj pic.twitter.com/hyUpruU9Eu
— ANI (@ANI) January 17, 2022
बिरजू महाराज यांनी आपली कारकीर्द अशी गाजवली कि त्यांना १९८३ मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सोबतच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानदेखील मिळाला आहे. याशिवाय २०१२ साली त्यांना विश्वरूपम चित्रपटातील नृत्य नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर २०१६ साली बाजीराव मस्तानीच्या ‘मोहे रंग दो लाल’ या गाण्यातील नृत्यदिग्दर्शनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
Discussion about this post