हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची निर्माती आणि मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशीचा अपघात झाला आहे. पल्लवी सध्या विवेक अग्निहोत्री यांचा आगामी सिनेमा ‘द वॅक्सीन वॉर’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हे चित्रीकरण हैद्राबाद येथे सुरु आहे. या चित्रीकरणादरम्यान गाडीचा ताबा सुटला आणि त्या गाडीने थेट पल्लवी यांना धडक दिली. ज्यामुळे पल्लवी जोशी यांना तातडीने उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अग्निहोत्रींचा ‘द वॅक्सीन वॉर’ हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाचे शूटिंग हैद्राबादला सूरु असून यामध्ये पल्लवी जोशी अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. मात्र शूटिंग दरम्यान झालेल्या या अपघातात पल्लवी जखमी झाल्या असून त्या उपचार घेत असल्यामुळे शूटिंगमध्ये खंड पडू शकतो. दरम्यान अपघात झाला असतानाही पल्लवी यांनी शूटिंग पूर्ण केले आणि त्यानंतर हैद्राबाद मधील एका स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल झाल्या. ‘द काश्मीर फाईल्स’मधील पल्लवी यांची भूमिका प्रचंड गाजली. यानंतर आता ‘द वॅक्सीन वॉर’ सिनेमामध्ये त्या साकारत असलेली भूमिका देखील चर्चेचा विषय ठरेल अशी त्यांना आशा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाच्या शूटिंग सेटवर अपघात झाल्यामूळे पल्लवी आता उपचार पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात करतील. ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा आगामी सिनेमा भारतीय शास्त्रज्ञांसह, जगातील सर्वात प्रभावी लस तयार करण्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळ रात्रीचा दिवस करणाऱ्या त्या प्रत्येक योद्ध्यावर आधारित आहे. जागतिक उत्पादकांच्या दबावाला तोंड देऊन आपल्या देशवासीयांचे प्राण वाचवण्यासाठी धडपडलेल्या भारतीय शास्त्रज्ञांची कथा या सिनेमात दाखवली जाणार आहे.
Discussion about this post