हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मूळची बीडची असलेली शामल सौंदरमल या गुणी गायिकेला भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी दत्तक घेतले आहे. पंकजा मुंडे यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट टाकून याबाबतची माहिती दिली. शामल सौंदरमल आणि तिचे कुटुंब सध्या मुंबईत वास्तव्यास असले तरीही ते मूळचे बीड येथील आहेत.
शामलची आई किशाबाई सौंदरमल यांचाही आवाज दैवी देणगी असल्यागत असून त्यांचा व्हिडिओदेखील यापूर्वी व्हायरल झाला होता. किशाबाई या दिव्यांग आहेत. पंकजा मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाचा गौरव करणारं काव्य किशाबाई सौंदरमल यांनी लिहिलं होतं. अत्यंत साधेपणाने घरात कणिक मळताना त्यांनी गायलेलं हे गाणं पंकजा मुंडे यांनीच फेसबुकवर प्रसिद्ध केलं होत.
किशाबाई यांची मुलगी शामल हिचं ‘ऐ मेर वतन के लोगो..’ हे गाणं पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर प्रसिद्ध केलं असून शामलला एक उत्तम गुरु लाभेपर्यंत आपण हिला दत्तक घेतोय, असं आश्वासनही पंकजा मुंडे यांनी दिले आहे. शामल सौंदरमल हिच्या गाण्याची एक झलक पहायला देखील बीडमधील लोक जमा होतात. अशा शामल चा आवाज पंतप्रधानांपर्यंत पोहचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिले आहे.
Discussion about this post