Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

झी मराठीच्या ‘बस बाई बस’ शोमध्ये पंकजा मुंडेंचा फिल्मी अंदाज; पहा प्रोमो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 12, 2022
in बातम्या, महाराष्ट्र, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bus Bai Bus
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकप्रिय झी मराठी वाहिनीवर सुरु झालेला ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम अगदी अल्पावधीतच चांगलाच गाजला आहे. या शोला प्रेक्षक मंडळी चांगला प्रतिसाद देत आहेत. आतापर्यंत या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी महिला येऊन गेल्या. राजकीय क्षेत्रातून सुप्रिया सुळे या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात सहभागी झाल्या होत्या. यानंतर आता आगामी भागात भाजप नेत्या पंकजा मुंडे येणार आहेत. पंकजा मुंडे या भागात विविध किस्से विविध प्रश्नांची उत्तरे देताना दिसतील.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

सध्या सोशल मीडियावर ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात पंकजा मुंडे आलेल्या भागाचा प्रोमो रिलीज झाला आहे. यातील एका प्रोमो व्हिडिओमध्ये पंकजा मुंडेंनी एक डायलॉग मारला आहे. सध्या सोशल मीडियावर हा डायलॉग चर्चेचा विषय ठरत आहे. या कार्यक्रमात पंकजा ताईंना एका महिलेने म्हटलं कि, मला वाटत तुमच्यात एक अभिनेत्री दडली आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

तर तुम्ही ‘एक चुटकी सिंधूर कि किंमत तुम क्या जानो’ हा डायलॉग बोला. फक्त आपण हा डायलॉग तुमच्यासाठी बदलू. ‘एक एक आमदार कि किंमत तुम क्या जानो सुबोध बाबू’. मग काय पंकजा ताईंनी फिल्मी अंदाजात हा डायलॉग बोलून दाखवला. त्यामुळे सध्या हा प्रोमो व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

यानंतर कार्यक्रमाचा होस्ट सुबोध भावे याने राजकीय विषयाला हात घातला आणि विचारले कि, तुम्ही कधी इतर पक्षातील नेत्यांना फोडलं आहे का? यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, होय मी विरोधीपक्षातील नेत्यांना फोडलंय. माझे बाबा गोपीनाथ मुंडेसाहेब यांनी मला सांगितलंय की कायम बेरजेचं राजकारण करायचं वजाबाकीचं नाही. त्यामुळे इतर पक्षात चांगलं काम करणाऱ्या लोकांना मी फोडलंय. बीड जिल्ह्यात झालेलं पक्षांतर त्याचंच द्योतक आहे. नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादीत येणं हे त्याचंच उदाहरण आहे. शिवाय सुरेश धसही भाजपामध्ये आल्या. त्यामुळे पक्षाच्या वाढीसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मी इतर पक्षातील चांगल्या नेत्यांना पक्षात आमंत्रित करते.’

Tags: Bus Bai BusInstagram PostPankaja MundePromo ReleaseViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group