हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिध्द मराठी अभिनेते किरण माने याना स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो मालिकेतून काढून टाकले. आपण राजकीय विषयांवर भाष्य करत असल्याने आपल्याला काढून टाकण्यात आले असा आरोप किरण माने यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण देखील तापलं. त्यातच आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यानी पॅनोरामा एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेच्या पदाधिकारी सुझाना घई यांना एक पत्र लिहित घडलेल्या प्रकरणाचे स्पष्टीकरण मागितलं आहे. या पत्रात किरण माने यांच्या पत्नी ललिता किरण माने यांच्या तक्रारीचा देखील उल्लेख केला आहे.
स्टार प्रवाह या वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतील अभिनेते किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता विविध माध्यमांवर आपल्या वैचारिक भूमिका मांडतात या कारणामुळे या मालिकेतून काढून टाकलं असून मालिका निर्मात्याच्या या कृतीमुळे एका प्रगल्भ अभिनेत्यावर अन्याय झाला आहे(1/3) pic.twitter.com/3gL8YRRQn4
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) January 17, 2022
स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता विविध माध्यमांवर आपल्या वैचारिक भूमिका मांडतात या कारणामुळे या मालिकेतून काढून टाकलं असून मालिका निर्मात्याच्या या कृतीमुळे एका प्रगल्भ अभिनेत्यावर अन्याय झाला आहे. यासोबतच कुटुंब आर्थिक संकटात सापडून मानसिक तणावात आहे असे किरण माने यांच्या पत्नी यांनी राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. असे रुपाली चाकणकर यांनी म्हंटल.
कलावंतांनी वैचारिक राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकणे ही बाब कलाकाराच्या वैचारिक व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला करणारी असल्यामुळे याबाबतीतचा लेखी खुलासा राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश या मालिकेच्या निर्मात्यांना देण्यात आलेले आहेत.(3/3)
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) January 17, 2022
कलावंतांनी वैचारिक राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकणे ही बाब कलाकाराच्या वैचारिक व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला करणारी असल्यामुळे याबाबतीतचा लेखी खुलासा राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश या मालिकेच्या निर्मात्यांना देण्यात आलेले आहेत. असे ट्विट रुपाली चाकणकर यांनी म्हंटल.
Discussion about this post