Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा ‘या’ तारखेला करणार साखरपुडा; तारीख आणि ठिकाण ठरलं!

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 11, 2023
in Trending, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rahgav_Pari
0
SHARES
742
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमीपार्टीचे खासदार राघव चड्ढा हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंडिंग विषय ठरले आहेत. गुपचूप डेटिंग, सिक्रेट रिलेशनशिप आणि आता साखरपुडा. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. दरम्यान ठिकठिकाणी हे दोघे एकत्र स्पॉट झाल्याने चर्चांना आणखीच उधाण आले होते. पण अजूनही या दोघांनी अधिकृतपणे याबाबत काहीच सांगितलेले नाही. अशातच आता परिणिती आणि राघव यांच्या साखरपुड्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

माहितीनुसार, परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा दोघेही एकत्र नुकतेच दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. एकाच गाडीतून दोघे उतरले आणि पुन्हा एकदा एकत्र स्पॉट झाले. या दरम्यानचा त्या दोघांचा एक व्हिडीओही समोर आला आहे. यावेळी परिणितीने गुलाबी रंगाचा ड्रेस तर राघव चड्ढा यांनी काळ्या रंगाच्या शर्ट परिधान केला होता. असे बोलले जात आहे कि, परिणिती आणि राघव यांचा येत्या १३ मे २०२३ रोजी साखरपुडा आहे. यामुळे ते दोघेही आपल्या साखरपुड्याच्या तयारीत मग्न आहेत. मुख्य म्हणजे दोन्ही बाजूने साखरपुड्याची जय्यत तयारी सुरु असून हा सोहळा दिल्लीत पार पडणार आहे.

View this post on Instagram

A post shared by B O L L Y W O O D (@filmyselfies.official)

एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यासाठी त्यांनी १५० लोकांना आमंत्रण दिले आहे. या सोहळ्यात दोघांचेही अत्यंत जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित असणार आहेत. त्यांच्या साखरपुडा समारंभात सकाळी सुखमणी साहिबचे पठण केले जाईल. त्यानंतर दोघेही एकमेकांना अंगठी घालतील आणि हा साखरपुडा संपन्न होईल. या सोहळ्यात भव्य डिनरचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती समोर येऊनही अजून तरी परिणीती किंवा राघव दोघांपैकी कुणीच काहीच अधिकृतरित्या बोलू इच्छित नाही हे नवलच! पण ये पब्लिक है जो सब जानती है! हे काही खोटं नाही. साखरपुड्यानंतर परिणिती आणि राघव या वर्षाच्या अखेरीस विवाहबंधनात अडकू शकतात, अशीदेखील चर्चा सुरु आहे.

Tags: EngagementInstagram Postparineeti chopraRaghav ChadhaViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group