हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे अतिशय कडक निर्बंधांच्या चौकटीत सामावून सारे कार्यरत आहेत. मात्र तरीही दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या फक्त वाढतानाच दिसत आहे. दरम्यान सिनेसृष्टीतसुद्धा कोरोनाचा विळखा अगदी घट्ट होऊ लागला आहे. अनेक कलाकार या विळख्यात जखडले गेले आहेत. मात्र धक्काची बाब अशी कि, अभिनेत्री पारुल चौधरीला दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. इतकेच नव्हे तर तिला प्रचंड त्रास होत असल्याचे तिने सांगितले आहे.
अनुपमा या मालिकेतील पारुल चौधरीला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असून, तिला होणाऱ्या त्रासाबद्दल तिने सोशल मीडियावर सांगितले आहे. यात तिने पुन्हा एकदा कोरोनामूळे त्रस्त झाल्याचे सांगितले आहे. तिला पहिल्यावेळी कोणतीही लक्षणे नव्हती मात्र यावेळी काही लक्षणे जाणवत आहेत. सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे आणि अश्यावेळी एकदा नव्हे तर दोनदा या विषाणूला सामोरे जाणे अत्यंत काळजीची बाब आहे. तसेच ती शूटिंगच्या वातावरणाला खूप मिस करतेय असेही तिने म्हटले आहे.
ती म्हणाली, मला सहा महिन्यांपूर्वी एका वेबसिरिजचे चित्रीकरण करायचे होते. त्यासाठी मी कोरोनाची टेस्ट केली होती. त्यावेळी माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. पण त्यावेळी माझ्यात कोणतीही कोरोनाची लक्षणं नव्हती. पण गेल्या काही दिवसांपासून माझे डोकं खूप दुखत आहे तसेच अंग दुखत आहे. मला कसलीही टेस्ट येत नाहीये, तसेच कसलाही वास येत नाही. तसेच जुलाब होत आहे. त्यामुळे माझ्यात त्राणच उरलेला नाहीये. कोरोनाची टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली असून मी होम क्वांरंटाईन आहे. माझे आई-वडील, बहीण यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सगळ्यांवरच उपचार सुरू आहेत. आमचे फ्रेंड्स आम्हाला मदत करत आहेत.
Discussion about this post