हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे इतिहासाची पाने सुवर्ण झाली हे आपण सारेच जाणतो. हा इतिहास प्रत्येक मराठी माणसाची आन बान आणि शान आहे. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपटांमधून जेव्हा हा इतिहास आपल्या समोर येतो तेव्हा गर्वाने प्रत्येकाचा उर भरून येतो. यानंतर आता दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या मराठी ऐतिहासिक चित्रपटाची मोठी चर्चा आहे. हा चित्रपट येत्या १८ फेब्रुवारी २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून यामधील मुख्य भूमिका एक तडफदार अभिनेता साकारणार आहे. बाजीप्रभूंची भूमिका हि मुळात फारच पराक्रमी आणि आव्हानात्मक आहे आणि हि भूमिका साकारत आहेत मराठी अभिनेता अजय पुरकर.
शिवराज अष्टक या संकल्पनेअंतर्गत ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटांनंतर लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी स्वराज्याच्या वाटेवरील तिसरं सुवर्णपान ‘पावनखिंड’च्या निमित्ताने उलघडत आहेत. ‘तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला!’ असं म्हणत मृत्यूलाही थांबायला सांगणाऱ्या शूरवीर, महापराक्रमी बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याची यशोगाथा सांगणारा ‘पावनखिंड’ १८ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटात अजय पुरकर यांनी बाजीप्रभूंची भूमिका साकारली आहे. तर शिवरायांच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर दिसत आहेत. चित्रपटातील स्टारकास्ट एकदम तगडी आहे. त्यामुळे चित्रपट कथानकासह एकंदरच अव्वल असेल यात काही वादच नाही.
ए.ए.फिल्म्स प्रस्तुत आणि आलमंड्स क्रिएशन्स निर्मित ‘पावनखिंड’ची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. या चित्रपटामध्ये मराठी अभिनेता अजय पुरकर, चिन्मय मांडलेकर यांच्यासह मृणाल कुलकर्णी, वैभव मांगले, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे आदी कलाकारांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत.
Discussion about this post