हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील ऐतिहासिक कलाकृती पावनखिंड, फर्जंद, फत्तेशीकस्त, शेर शिवराज यांसारख्या अनेक चित्रपटांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारणारे मराठी अभिनेते अजय पुरकर यांनी आपली स्वप्नपूर्ती केली आहे. पावनखिंड या चित्रपटात अभिनेता अजय पुरकर यांनी नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग मोठा झाला आहे. या चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यामुळे आपल्या स्वप्नपूर्तीची माहिती स्वतः अजय पुरकर यांनी सोशल मीडियावर दिली आहे.
अभिनेता अजय पुरकर यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी स्वतःचं एक घर बांधलं आहे. या घरासंबंधीत अत्यंत महत्वाची माहिती त्यांनी आपल्या चाहत्यांना दिली आहे. पावनखिंड चित्रपटात त्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली होती आणि त्यामुळे या भूमिकेचा त्यांच्यावर विशेष प्रभाव आहे. ज्या भूमीत पावनखिंडीची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर असावं अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणून जून २०२२ रोजी पुरकर यांनी या भूमीत स्वतःचं घर बांधलं. या घराला त्यांनी ‘आई – बाबांचं घर’ असं नाव दिलं.
अजय पुरकर यांनी याच घराला आता व्यावसायिक रूप दिले आहे. ‘आई बाबांचं घर’ हे अजय पुरकर यांचं स्वप्न होतं. त्यामुळे त्यांनी या घराचे खूप कोडकौतुक केले आणि आता हे घर सर्वांसाठी खुले केले आहे. अजय यांनी ‘आई बाबांचं घर’ या नावाने एक वेबसाईट बनवली आहे. यावर येथील सर्व माहिती इतरांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. विशाळगडाजवळ आंबा घाट येथे हे घर आहे आणि याच्या आसपास निसर्गरम्य वातावरण आहे. शिवाय लोकांच्या राहण्या- खाण्याची आणि जेवणाची सोय येथे केली आहे. याशिवाय सिनियर सिटीझन लोकांसाठी रोड टू रोड पीक आणि ड्रॉपची सोयदेखील ठेवण्यात आली आहे.
Discussion about this post