Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बे बनाव झाला, मतभेद झाले कि खूप भांडतो पण..’; सोनालीच्या बेस्ट फ्रेंडची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 19, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sonalee_Phulawa
0
SHARES
62
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काल १८ मे रोजी मराठी सिनेविश्वाची अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा वाढदिवस होता. यानिमित्ताने सोनालीच्या सोशल मीडियावर हँडलवर चाहते, सहकलाकार मंडळी, मित्र परिवार आणि कुटुंबीयांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. तशी सोनाली सगळ्यांचीच मैत्रीण आहे. कधी भांडली, रुसली, फुगली असं ऐकिवात तरी नाही. पण सोनालीची सगळ्यात चांगली गट्टी आहे ती प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकरसोबत. अनेकदा या मैत्रिणी सोशल मीडियावर एकमेकींसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतात. मग आता मैत्रिणीचा वाढदिवस आणि फुलवा व्यक्त होणार नाही असं कसं.. तर फुलवा खामकरने सोनालीसोबतचे काही फोटो शेअर करत एक किस्सादेखील शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

फुलवाने सोनालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिलंय, ‘सोनाली आपण २००८ मध्ये जेव्हा भेटलो तेव्हापासून तू आहेस तशीच आहेस! एक माणूस म्हणून या यशाचा, कीर्तीचा कोणताही परिणाम तुझ्यावर झालेला नाही आणि मला ते खूप महत्वाचं वाटतं. मला ‘स् सासुचा’ या माझ्या पहिल्या चित्रपटाच्या गाण्याच्या चित्रीकरणाचा पहिला दिवस आठवतो. मी खूप घाबरलेली होते. मला काहीच माहीत नव्हतं, सेट वर काय असतं, कसं असतं वगैरे.. कधीच कोणाला असिस्ट नव्हतं न केलं. फक्त घरचा अभ्यास करून गेले होते.

View this post on Instagram

A post shared by PHULAWA (@phulawa)

कोणी मदतीला सुद्धा नव्हतं! इतक्यात मला फुलवा ताई म्हणून जोरात हाक मारत एक अत्यंत सुंदर, गोड २० वर्षांची मुलगी धावत आली आणि तिने मला गच्च मिठी मारली आणि म्हणाली की ती माझी बुगी वुगीपासून फॅन आहे आणि तिला मला पाहून खूप आनंद झाला आहे. माझ्या बरोबर काम करायला मिळणार म्हणून!! बास्स त्यावेळी तुझ्या या एका वाक्याने मला खूप आत्मविश्वास मिळाला होता सोनाली!!’

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

पुढे आपल्या दोघींच्या आयुष्यात खूप काही घडलं. कीर्ती, पैसा, प्रेक्षकांचं प्रेम सगळं सगळं आलं. पण आजही आपलं नातं आहे तसंच आहे… तू आहे तशीच आहेस… आणि ते सर्वांना नाही ग जमत… आजही आपल्यात काही बे बनाव झाला, आपली मतं नाही जुळली की आपण खूप भांडतो, खूप काही बोलतो, आपली मतं परखडपणे मांडतो मात्र एकमेकींना धरून राहतो…. हेच आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे नाही का ग..? बाकी सगळं येत जात असतं नाही का..?? सोनाली अशीच रहा.. खूप आनंदी रहा… खूप छान काम कर… तुला माझे खूप खूप आशीर्वाद आणि खूप खूप खूप प्रेम!!!’

Tags: Instagram PostPhulawa Khamkarsonalee kulkarniViral Photosviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group