Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त; PM मोदीही झाले भावूक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 21, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
743
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कॉमिक अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे आज २१ सप्टेंबर २०२२ रोजी निधन झाले आहे. दरम्यान ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शिखा आणि मुलं अंतरा व आयुष्मान असा परिवार आहे. गेल्या एक महिन्याहून अधिक काळ ते लाइफ स्पोर्ट सिस्टमवर होते. अखेर काळ आला आणि सर्वांचे लाडके कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच त्यांचे चाहते, सिनेकलाकार आणि अगदी राजकीय क्षेत्रातील बड्या नेत्यांनीही दुःख व्यक्त केले आहे. इतकेच नव्हे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Raju Srivastava brightened our lives with laughter, humour and positivity. He leaves us too soon but he will continue to live in the hearts of countless people thanks to his rich work over the years. His demise is saddening. Condolences to his family and admirers. Om Shanti. pic.twitter.com/U9UjGcfeBK

— Narendra Modi (@narendramodi) September 21, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करीत राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे कि, ‘राजू श्रीवास्तव यांनी आमचे जीवन हास्य, विनोद आणि सकारात्मकतेने उजळले. ते खूप लवकर आपल्यातून निघून गेले. पण त्यांच्या अनेक वर्षांच्या समृद्ध कार्यामुळे ते असंख्य लोकांच्या हृदयात जिवंत राहतील. त्यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या माझ्या संवेदना. ओम शांती..!!’

श्री राजू श्रीवास्तव जी को ईश्वर सद्गति प्रदान करें, यही प्रार्थना करता हूं… pic.twitter.com/MR8YTpoyMW

— Yogi Adityanath (@myogiadityanath) September 21, 2022

याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. ‘आपण राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबाच्या दुःखात सामील आहोत आणि ईश्वर त्यांना या दुःखातून बाहेर येण्याचं बळ देवो’ असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी संवेदना व्यक्त केली.

सुप्रसिद्ध हास्य कलाकार राजू श्रीवास्तव जी का एक विशिष्ट अंदाज था, उन्होंने अपनी अद्भुत प्रतिभा से सभी को प्रभावित किया। उनका निधन कला जगत के लिए एक बड़ी क्षति है। मैं उनके परिजनों व प्रशंसकों के प्रति संवेदना व्यक्त करता हूँ। ईश्वर उन्हें यह दुःख सहने की शक्ति दें। ॐ शांति शांति

— Amit Shah (@AmitShah) September 21, 2022

तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करीत राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे कि, ‘प्रख्यात कॉमेडियन राजू श्रीवास्तव जी यांची एक विशिष्ट शैली होती, त्यांनी आपल्या अप्रतिम प्रतिभेने सर्वांना प्रभावित केले. त्यांच्या निधनाने कलाविश्वाची मोठी हानी झाली आहे. मी त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांति शांति’

सुप्रसिद्ध हास्य कलाकार, राजू श्रीवास्तव जी के निधन से मुझे गहरा दुःख हुआ है। वे एक मंझे हुए कलाकार होने के साथ-साथ एक बेहद ज़िंदादिल इंसान भी थे। सामाजिक क्षेत्र में भी वे काफ़ी सक्रिय रहते थे। उनके शोकाकुल परिवार एवं प्रशंसकों के प्रति मैं अपनी संवेदना व्यक्त करता हूँ।ॐ शान्ति!

— Rajnath Singh (@rajnathsingh) September 21, 2022

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून श्रीवास्तव यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिले आहे कि, ‘प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. एक कुशल कलाकार असण्यासोबतच ते अतिशय जिंदादिल व्यक्ती देखील होते. सामाजिक क्षेत्रातही ते सक्रिय होते. मी त्यांच्या शोकसंतप्त कुटुंबीयांना आणि चाहत्यांना माझ्या संवेदना व्यक्त करतो. शांती!’

मशहूर हास्य कलाकार राजू श्रीवास्तव जी का निधन बेहद दुखद। ईश्वर दिवंगत आत्मा को अपने श्रीचरणों में स्थान दें। इस दुख की घड़ी में उनके परिजनों एवं सभी प्रशंसकों के प्रति मेरी संवेदनाएँ। pic.twitter.com/l7cPK1bCAS

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 21, 2022

याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील दुःख व्यक्त करणारे ट्विट केले आहे. त्यांनी यात लिहिलं आहे की, ‘प्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर मला खूप दुःख झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि देवाच्या चरणी त्यांना स्थान मिळो. या दुःखाच्या क्षणी मी त्यांच्या कुटुंबाच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सामिल आहे.’

Funeral of comedian Raju Srivastav to be held tomorrow, September 22, at Nigambodh Ghat in Delhi, confirms his family. pic.twitter.com/XTc2XdUncm

— ANI (@ANI) September 21, 2022

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर उद्या, २२ सप्टेंबर २०२२ रोजी दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. मात्र आज त्यांच्या निधनाची बातमी पसरताच मनोरंजन सृष्टीत शोकाकुल वातावरण निर्माण झाले. तसेच त्यांचे चाहते सोशल मीडियावर टाहो फोडताना दिसत आहेत.

Tags: death newsEmotional Post ViralPoliticiansRaju SrivastavaTweeter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group