हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अगदी चार दिवसात दोन अत्यंत प्रतिभावान कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. यातील एक म्हणजे अभिनेते घनश्याम नायक आणि दुसरे म्हणजे अरविंद त्रिवेदी. तारक मेहता का उलटा चष्माच्या माध्यमातून नट्टू काका हे पात्र साकारत आपला असा वेगळा चाहता वर्ग निर्माण करणारे घनश्याम नायक दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत होते. मात्र रविवारी (३ ऑक्टोबर २०२१ रोजी) अखेर त्यांची हि झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर रामानंद सागर यांच्या रामायणातील रावण भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी काळाच्या पडद्याआड झाले. ते दीर्घकाळापासून तब्येतीच्या तक्रारींनी ग्रासले होते. या दोन्ही प्रतिभावान कलाकारांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली दिली.
In the last few days, we have lost two talented actors who won the hearts of people through their works. Shri Ghanashyam Nayak will be remembered for his multifaceted roles, most notably in the popular show ‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah.’ He was also extremely kind and humble. pic.twitter.com/nwqKVpm4ry
— Narendra Modi (@narendramodi) October 6, 2021
तारक मेहता का उलटा चष्मा’तील नट्टू काका भारतात घनश्याम नायक याना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधानांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे कि, गेल्या काही दिवसात, आम्ही दोन प्रतिभावान अभिनेते गमावले ज्यांनी त्यांच्या कामांद्वारे लोकांची मने जिंकली. श्री घनश्याम नायक त्यांच्या बहुआयामी भूमिकांसाठी स्मरणात राहतील, विशेषतः ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय शोमध्ये ते अत्यंत दयाळू आणि नम्र होते. अश्या स्वरूपाचे ट्विट करीत त्यांनी घनश्याम नायक याना श्रद्धांजली दिली. तर याच ट्विटच्या रिप्लाय मध्ये त्यांनी आणखी एक ट्विट केले.
We have lost Shri Arvind Trivedi, who was not only an exceptional actor but also was passionate about public service. For generations of Indians, he will be remembered for his work in the Ramayan TV serial. Condolences to the families and admirers of both actors. Om Shanti. pic.twitter.com/cB7VaXuKOJ
— Narendra Modi (@narendramodi) October 6, 2021
अरविंद त्रिवेदी यांना श्रद्धांजली देताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले कि, आपण श्री अरविंद त्रिवेदी यांना गमावले आहे, जे केवळ एक अपवादात्मक अभिनेतेच नव्हे तर लोकसेवेबद्दल उत्कट व्यक्तित्व होते. भारतीयांच्या पिढ्यान्पिढ्या, रामायण टीव्ही मालिकेतील त्यांच्या कामासाठी त्यांना कायम स्मरणात ठेवतील. दोन्ही अभिनेत्यांच्या कुटुंबीयांना आणि प्रशंसकांना संवेदना. ओम शांती.
Discussion about this post