हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच महत्वपूर्ण गोष्टींसाठी देशातील तमाम नागरिकांना आवाहन करीत असतात. सध्या त्यांनीच एका मालिकेसाठी भारतवासीयांना संबोधित केले आहे. ऐकायला थोडं नवल वाटत असलं तरीही हेच खरं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भारतीयांना एक मालिका पाहण्याचे आवाहन केले आहे. या मालिकेचे नाव ‘स्वराज : द कॉम्प्रिहेन्सिव्ह गाथा ऑफ इंडियाज फ्रीडम स्ट्रगल’ असे आहे. ही मालिका नुकतीच दूरदर्शन वाहिनीवर सुरू झाली आहे. पण हीच मालिका पाहण्याचे आवाहन का केले..? ते जाणून घेऊ.
‘स्वराज : द कॉम्प्रिहेन्सिव्ह गाथा ऑफ इंडियाज फ्रीडम स्ट्रगल’ या मालिकेमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील अपरिचित वीरांनी दिलेलय बलिदानाची वीर गाथा दाखवण्यात येणार आहे. म्हणूनच पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये या मालिकेचा उल्लेख केला. देशातील तमाम जनतेला त्यांनी ‘स्वराज : द समग्र गाथा ऑफ इंडियाज फ्रीडम स्ट्रगल’ ही मालिका आवर्जून पाहण्याचे आवाहन केले.
मोदी म्हणाले कि, ‘हा उत्तम उपक्रम आहे. कारण याद्वारे देशाच्या नव्या पिढीला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतलेल्या अपरिचित नायक आणि नायिकांची माहिती होईल. म्हणूनच मी तुम्हा सर्वांना ही मालिका पाहण्यासाठी वेळ काढण्याचे आवाहन करतो, जेणे करून या महान नायकांबद्दल आपल्या देशात एक नवीन जागरूकता पसरेल.’
‘स्वराज : द कॉम्प्रिहेन्सिव्ह गाथा ऑफ इंडियाज फ्रीडम स्ट्रगल’ ही मालिका आठवड्याच्या प्रत्येक रविवारी रात्री ९ वाजता दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित होईल. या मालिकेचे एकूण ७५ भाग आहेत. म्हणजेच हि मालिका ७५ आठवडे दाखवली जाईल. मुख्य म्हणजे ही मालिका इंग्रजी आणि ९ विविध प्रादेशिक भाषांमध्ये डब केली आहे. तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, गुजराती, ओरिया, बंगाली, आसामी या ९ भाषांमध्ये हि मालिका प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेच्या पहिल्या भागात १९४८ मध्ये ‘वास्को द गामा’ने केलेला भारत प्रवास दाखवण्यात आला होता. यानंतर आता आगामी भागांमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील नेते दाखवले जाणार आहेत. यामध्ये राणी अबक्का, बक्षी जगबंधू, कान्हू मुर्मू यांचा समावेश आहे.
Discussion about this post