हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरसमुळे चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. पण आता केंद्र सरकारने अनलॉकच्या ५व्या टप्प्यात चित्रपटगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. चित्रपटगृहे उघडताच ‘PM नरेंद्र मोदी’ चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे.चित्रपट निर्माता संदीप सिंहने हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करणार असल्याची माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित “पीएम नरेंद्र मोदी” या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा नरेंद्र मोदींचा प्रवास दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट २४ मे २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. पण त्यावेळी देशात असलेल्या निवडणूकांमुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास चित्रपटगृहे सुरु होताच पुन्हा पाहायला मिळणे या पेक्षा काय चांगलं असू शकतं असे संदीपने म्हटले आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट २०१९ सालच्या लोकसभा निवडणूकीच्या काळात प्रदर्शित झाल्यामुळे बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास चित्रपटगृहे सुरु होताच पुन्हा पाहायला मिळणे या पेक्षा काय चांगलं असू शकतं. आता पुन्हा चित्रपटगृहे उघडणार असल्यामुळे मी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा विचार केला आहे. माझा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा टीव्हीवर प्रदर्शित झालेला नाही’ असे संदीपने म्हटले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’