हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संगीत कलाक्षेत्रातील अजरामर आवाज म्हणजेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर. आज दीदींची जयंती. ज्या आवाजाने कित्येक कानांना मंत्रमुग्ध केले तो आवाज आजही काळजाला छेद देतो. दीदींनी फक्त भारतालाच नव्हे तर साऱ्या जगातील संगीतप्रेमींना सुरांचं वेड लावलंय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दीदींच्या जयंतीनिमित्त ‘मन की बात’ कार्यक्रमातून पुन्हा त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. शिवाय अयोध्येतील एका चौकाला गानकोकिळा लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले आहे. याविषयी मोदींनी लता दीदी आणि त्यांची रामभक्ती याबद्दल सांगितले आहे.
In Lata Didi’s honour a Chowk is being named after her in Ayodhya. https://t.co/CmeLVAdTK5
— Narendra Modi (@narendramodi) September 28, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, ‘दीदी म्हणायच्या माणूस त्याच्या कर्मानं मोठा होतो. दीदींनी त्यांच्या स्वरांनी साऱ्या जगाला जोडलं. अयोध्येतल्या चौकाला लता दीदींचे नाव देण्यात आले आहे. ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. ज्याठिकाणी लता दीदी चौक आहे त्याठिकाणी आता सांस्कृतिक संबंध आणखी दृढ होतील. लता दीदीच्या नावानं चौक ही आपल्या सर्वांसाठी अभिमानी बाब म्हणावी लागेल. त्यांचे सूर आणि संगीताबद्दलचे विचार आपल्यासोबत राहतील. त्यांची समाजाप्रती असलेली भूमिका, त्यासाठी त्यांनी केलेलं काम हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या कामांचा आदर्श आपण ठेवण्याची गरज आहे.’
लता दीदी के नाम पर बना ये चौक, हमारे देश में कला जगत से जुड़े लोगों के लिए भी प्रेरणा स्थली की तरह कार्य करेगा।
ये बताएगा कि भारत की जड़ों से जुड़े रहकर, आधुनिकता की ओर बढ़ते हुए, भारत की कला और संस्कृति को विश्व के कोने-कोने तक पहुंचाना, ये भी हमारा कर्तव्य है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 28, 2022
मोदी बोलताना पुढे म्हणाले कि, ‘लता दीदींच्या सुरांनी आपल्याला राममय केले आहे. लता मंगेशकरांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी त्यांनी लता दीदींच्या वेगवेगळ्या आठवणींना शब्दरुप दिले. मला आठवतं की, जेव्हा अयोध्यामध्ये राममंदिराचे भूमिपूजन करण्यात आले तेव्हा मला अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यासाठी लता दीदींचा फोन आला होता. अयोध्या चौकातील दीदींचे नाव आणि त्याठिकाणी उभारण्यात आलेली वीणा ही आता सर्वांचे मुख्य आकर्षण राहील.’
Discussion about this post